प्रवाशाचा खिसा मारला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:42+5:302021-03-05T04:32:42+5:30

आठवडी बाजारातून माेबाइल लंपास उस्मानाबाद - तालुक्यातील समुद्रवाणी येथील आठवडी बाजारासाठी चिखली येथील प्रमाेद महामुनी २ मार्च राेज गेले ...

Hit the passenger's pocket ... | प्रवाशाचा खिसा मारला...

प्रवाशाचा खिसा मारला...

googlenewsNext

आठवडी बाजारातून माेबाइल लंपास

उस्मानाबाद - तालुक्यातील समुद्रवाणी येथील आठवडी बाजारासाठी चिखली येथील प्रमाेद महामुनी २ मार्च राेज गेले हाेते. ते खरेदीत व्यस्त असल्याची संधी साधत अज्ञाताने त्यांच्या खिशातील माेबाइल लांबविला. गर्दीचा फायदा घेत चाेरटा पासार झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर महामुनी यांनी बेंबळी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

चाैदा वर्षीय मुलीचे अपहरण

उस्मानाबाद - पुणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेली एक चाैदा वर्षीय मुलगी उस्मानाबाद जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी आली हाेती. गावातच राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने २ मार्च राेजी तिचे घरातून अपहरण केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध भादंसंचे कलम ३७९ अन्वये संबंधित पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

उमरगा येथे जुगार विराेधी कारवाई

उस्मानाबाद - उमरगा येथील समीर महेमूद हानुरे हे ३ मार्च राेजी शहरातीलच याटे संकुलासमाेर जुगाराचे साहित्य बाळगले असताना आढळून आहे. यानंतर उमरगा ठाण्याच्या पथकाने कारवाई करीत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व राेख १ हजार ९० रुपये जप्त केले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध उमरगा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

२९९ चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई

उस्मानाबाद -माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील अठरा पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून कारवाईची माेहीम राबविण्यात आली. यात २९९ चालकांकडून दंडापाेटी सुमारे ७५ हजार ३०० रुपये वसूल करण्यात आले. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

Web Title: Hit the passenger's pocket ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.