अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:13+5:302021-08-02T04:12:13+5:30

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून तथा महसूल कर्मचारी ...

Greetings to Annabhau Sathe, Lokmanya Tilak | अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

googlenewsNext

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव मैंदपवाड, नरसिंह ढवळे, शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी कन्या प्रशाला

उस्मानाबाद : येथील मराठी कन्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मारकड यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पिसाळ यांनी केले, तर सुधीर पाचकुडवे यांनी आभार यांनी मानले.

नूतन विद्यामंदिर

उस्मानाबाद : येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, संतोष माळी, बंडू मदने यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला.

वसंत आश्रमशाळा

उस्मानाबाद : तालुक्यातील बावी येथील वसंत प्राथमिक, जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे मुख्याध्यापक बी.यू. जगताप यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सांस्कृतिक विभागप्रमुख प्राध्यापक व्ही.टी. राठोड, ए.आर. देशमुख, एन.बी. जाधव, ए.ए. जाधव, सेवक बी.एस. पाखरे, सोनवणे आदी उपस्थित होते.

भोसले हायस्कूल

उस्मानाबाद : येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक वाय.के. इंगळे, के.डी. हजारे, के.वाय. गायकवाड, डी.ए. देशमुख, टी.पी. शेटे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Annabhau Sathe, Lokmanya Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.