कंटेनर-कार अपघातात चार ठार; पाच गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 06:26 AM2020-03-21T06:26:32+5:302020-03-21T06:26:56+5:30

लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ कंटेनर व कारचा शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Four killed in container-car accident; Five seriously injured | कंटेनर-कार अपघातात चार ठार; पाच गंभीर जखमी

कंटेनर-कार अपघातात चार ठार; पाच गंभीर जखमी

googlenewsNext

लोहारा (जि़ उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ कंटेनर व कारचा शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात चालकासह एक महिला व तिच्या दोन लहान मुली जागीच ठार झाल्या आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील नारायण साठे व सतीश
पवार हे कामानिमित्त पुण्यातच वास्तव्यास होते.
पुणे शहरात कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याने नारायण साठे व सतिश पवार आपल्या कुटूंबासह एकाच कारने पुण्याहून शुक्रवारी माकणीकडे निघाले होते़ गाव अवघे तीन किलोमीटर असताना खेड पाटीजवळ माकणीहून येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली.

Web Title: Four killed in container-car accident; Five seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात