अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:45+5:302021-01-20T04:32:45+5:30

तालुक्यातील एका २१ वर्षीय युवकाने गावातीलच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस ४ जानेवारी रोजी वाशी येथून पळवून नेले होते. ...

Filed a case of atrocities | अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

googlenewsNext

तालुक्यातील एका २१ वर्षीय युवकाने गावातीलच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस ४ जानेवारी रोजी वाशी येथून पळवून नेले होते. या प्रकरणी सदर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी आरोपीचा शोध घेत त्यांच्या नातेवाइकाकडे चौकशी केली. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच प्रेमीयुगुल १८ जानेवारीला पोलीस स्टेशनला हजर झाले. हे प्रेमीयुगुल पोलिसात दाखल झाल्याचे समजताच मुलीच्या वडिलांनी ठाण्यात हजर होऊन मुलीकडे विचारपूस केल्यानंतर तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, यातील मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल खांबे करीत असून, त्यांना पोलीस निरीक्षण उस्मान शेख सहकार्य करीत आहेत.

Web Title: Filed a case of atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.