मावेजा मागणीवर शेतकरी ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:32 AM2021-04-21T04:32:39+5:302021-04-21T04:32:39+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते काटी या १५ किमी रस्ता रूंदीकरणाचे काम ठेकेदारामार्फत सुरू होते. परंतु, मावेजासाठी काही ...

Farmers insist on Maveja demand | मावेजा मागणीवर शेतकरी ठाम

मावेजा मागणीवर शेतकरी ठाम

googlenewsNext

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते काटी या १५ किमी रस्ता रूंदीकरणाचे काम ठेकेदारामार्फत सुरू होते. परंतु, मावेजासाठी काही शेतकऱ्यांनी हे काम अडविले. या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु, मावेजाच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही. यापूर्वीही रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाने काही शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्याचा मावेजा मिळाला नाही. असे असतानाच आता रूंदीकरण कामाची खोदाई सुरू केल्याने शेतकऱ्यांनी हे काम थांबविले. त्यामुळे बांधकाम विभागाचे गायकवाड . अभियंता चव्हाण, शेतकरी कृष्णाथ धोत्रे, रामा देवकर, सतीश कवडे, गडाजी येळणे, सतीश येळणे, बाळू येळणे, रामदास येळणे, राजू येळणे, रामहारी गुंड, त्रिंबक मगर, आण्णासाहेब गुंड आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers insist on Maveja demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.