CoronaVirus : तत्पर प्रशासन ! जिल्हाधिकाऱ्यांना मेल केला अन् काही तासांत औषधी मुंबईहून ईटकुरात दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:56 PM2020-04-18T17:56:27+5:302020-04-18T17:59:08+5:30

अवघड शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची औषधे लॉकडाऊनमुळे होत नव्हती उपलब्ध

CoronaVirus: Instant administration! Mailed to the collectors and within a few hours the drug was transferred from Mumbai to Itkur! | CoronaVirus : तत्पर प्रशासन ! जिल्हाधिकाऱ्यांना मेल केला अन् काही तासांत औषधी मुंबईहून ईटकुरात दाखल !

CoronaVirus : तत्पर प्रशासन ! जिल्हाधिकाऱ्यांना मेल केला अन् काही तासांत औषधी मुंबईहून ईटकुरात दाखल !

googlenewsNext
ठळक मुद्देकिडनीच्या सर्जरीनंतर लागणार होती औषधीकेवळ २० एप्रिलपर्यंतची होती औषधी

- बालाजी आडसूळ
कळंब (जि. उस्मानाबाद) :एका अवघड शस्त्रक्रियेनंतर घ्याव्या लागणाऱ्या नियमित औषधीचा साठा संपत आला. यातच औषधी स्थानिक पातळीवर मिळत नसल्याने तो अधीकच चिंतेत होता. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हतबल झालेल्या त्या तरूणाने बसल्याजागी जिल्हाधिकाऱ्यांना मेल पाठवला. आपली विवंचना मांडल्यानंतर अवघ्या काही तासात जिल्हाधिकारी, तहसीलदार व औषधी प्रशासनाच्या सजगतेमुळे त्या तरूणाला हवी ती औषधी ‘मुंबई ते इटकूर’ असा प्रवास करत दाखल झाली.

महसूल विभागाचे नेटवर्क अगदी तळागाळात पोहचलेले आहे.जिल्हाधिकारी ते गावच्या कोतवालापर्यंत असे सर्वजण थेट जनतेची कनेक्ट असतात. यामुळेच अडलेनडले, समस्यांनी ग्रस्त लोक संकटकाळात धाव घेतात ती महसूल विभागाची. कारण तिथेच प्रश्नाची सोडवणूक व्हायची आशा असते. तेथेच मिळते अनेकांना समाधान. याचाच प्रत्यय कळंब तालुक्यातील इटकूर येथील आशुतोष विकास क्षिरसागर या तरूणाला आला आहे. मागच्या काही वर्षात आशुतोष यांचे किडणी ट्रान्सफन्ट झाले आहे. या अवघड शस्त्रक्रियेनंतर त्याला नियमित औषधी घ्यावी लागत आहे. आजवर शस्त्रक्रिया झालेल्या नवी मुंबई भागातील एका केमिस्टडून ही औषधी तो घेत होता. सद्या २० एप्रिलपर्यंत पुरेल एवढी त्याकडे औषधी होती.

परंतु,लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या व बाहेरही होम डिलिव्हरी करणारे उपलब्ध नसल्याने पुढील काळातील या अत्यंत गरजेच्या औषधीचे काय, असा प्रश्न त्यांना सतावत होता.  यावर त्यांनी स्थानिक पातळीवर औषधी मिळते का, याची चौकशी केली असता ती मिळत नव्हती. यामुळे हतबल झालेल्या आशुतोष यांनी थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना मेल करून आपली कैफियत मांडली. जिल्हाधिकारी यांनीही यास गांभीर्याने घेत सर्व प्रमुख अधिका-यांना याविषयी अवगत केले. त्या तरूणास उलटटपाली मेल पाठवून संपर्क क्रमांक मागवून घेतला. 

तातडीने कळंबच्या तहसीलदार मंजूषा लटपटे यांना कळवले. तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा केली. कळंब येथे स्वत: त्या औषधींची उपलब्धता होते का याची पाहणी केली. मात्र औषधी मिळत नसल्याचे स्पष्ट होताच अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त  सीध यांच्याशी संपर्क साधला. यानंतर महसूल विभागाच्या सोबतीला अन्न व औषध प्रशासन ही धाऊन आले.त्यांनी थेट क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधत औषधी, उपचार ठिकाण यांचे डिटेल्स जाणून घेतले. यानंतर सहाय्यक आयुक्त  सीध यांनी  औषध निरिक्षक विलास दुसाने यांना आशुतोष यांच्या समस्याची कल्पना दिली. दुसाने यांनी गांभीर्याने घेत औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. योगायोगाने ते नवी मुंबईत होते. त्यांनी औषध निर्मिती कंपनीच्या मार्केटिंग प्रतिनिधीशी संपर्क केला. स्टॉकीस्टचा पत्ता शोधला. अन् मुंबईतील सानपाडा येथून खिशातील सात हजार रूपये देत आशुतोष क्षिरसागर यांना आवश्यक असलेली औषधी उपलब्ध करून दिली. प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

अवघ्या काही तासांत औषधी मुंबई टू ईटकूर... 
गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला होता. यानंतर शोध घेत घेत शुक्रवारी सकाळी औषध निरिक्षक विलास दुसाने यांनी ती औषधी प्राप्त केली. रात्री तातडीने औषधी घेवून ते उस्मानाबादला पोहचले. यानंतर शनिवारी सकाळी कळंबच्या तहसलीदार मंजूषा लटपटे यांनी ती औषधी अव्वल कारकून नितेश काळे यांच्याकरवी कळंबला आणली. कळंबवरून कोतवाल सुनिल माळी यांना लागलीच १ वाजता औषधी घेवून इटकूरला पाठवले. आणि इटकूरचे कोतवाल सतीश राक्षे व सुनिल माळी यांनी ती आशुतोष क्षिरसागर यांच्याकडे १.३० वाजेच्या सुमारास सुपूर्द केली.

Web Title: CoronaVirus: Instant administration! Mailed to the collectors and within a few hours the drug was transferred from Mumbai to Itkur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.