चारित्र्य सिद्धतेसाठी उकळत्या तेलातून काढले नाणे; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 01:05 AM2021-02-23T01:05:50+5:302021-02-23T06:59:17+5:30

उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

Coin extracted from boiling oil for character proofing; Incidents in Usmanabad | चारित्र्य सिद्धतेसाठी उकळत्या तेलातून काढले नाणे; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

चारित्र्य सिद्धतेसाठी उकळत्या तेलातून काढले नाणे; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

googlenewsNext

उस्मानाबाद : चारित्र्य सिद्ध करण्यासाठी परंडा येथील एका महिलेस उकळत्या तेलातून नाणे काढण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या महिलेने समोर येत या प्रकरणाला वेगळीच कलाटणी दिली. पतीचे समर्थन करीत तिने पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप सोमवारी केला आहे.

परंडा शहराजवळील पारधी समाजातील एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिला तिचे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी पतीने उकळत्या तेलात ५ रुपयांचे नाणे टाकून ते काढावयास भाग पाडल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे. या घटनेत तिचा हात चांगलाच भाजला आहे. दरम्यान, पतीवर टीका होऊ लागल्यानंतर या महिलेचा पुन्हा एक दुसरा व्हिडीओ माध्यमांच्या हाती लागला. यात ही महिला एका पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करताना दिसत आहे.

तिच्या दाव्यानुसार एक पोलीस कर्मचारी तिच्या पतीला सातत्याने जेलमध्ये टाकण्याची धमकी देत न्यायचा. यानंतर त्याने व गावातीलच एका नागरिकाने ४ दिवस ५ रात्री अज्ञात स्थळी ठेवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार नेहमीचाच सुरू झाला. यानंतर समाजाच्या परंपरेनुसारच तिने चारित्र्य सिद्ध करण्यासाठी तेलातून नाणे काढण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यामुळे हा प्रकार घडला त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी ही महिला करीत आहे.  दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस दलातही एकच खळबळ उडाली असून, त्यांचे म्हणणे नोंदवून घेण्यासाठी पीडित पती-पत्नीचा शोध पोलीस घेऊ लागले आहेत. 

पतीसह तिघांविरुद्ध सोलापुरात गुन्हा

गरम तेलात हात घालून नाणे काढण्यास लावणाऱ्या पती व अत्याचार करणाऱ्या दोघांविरुद्ध सोलापुरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने सोलापुरात येऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना भेटून या ठिकाणीच फिर्याद घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती त्यामुळे गुन्हा दाखल केला.

Web Title: Coin extracted from boiling oil for character proofing; Incidents in Usmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.