सव्वासहा कोटींच्या पुस्तकांचे वाटप संशयास्पद; घोटाळ्याचा वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 04:17 AM2020-02-28T04:17:01+5:302020-02-28T04:17:12+5:30

बळीराजा चेतना योजनेतील निधीच्या गैरवापराचा आरोप

The allocation of billions of books is doubtful; The smell of scandal | सव्वासहा कोटींच्या पुस्तकांचे वाटप संशयास्पद; घोटाळ्याचा वास

सव्वासहा कोटींच्या पुस्तकांचे वाटप संशयास्पद; घोटाळ्याचा वास

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बळीराजा चेतना योजनेतील निधीतून थोडथोडकी नव्हे तर तब्बल सव्वासहा कोटी रुपयांची पुस्तके शेतकऱ्यांना वाटल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला आहे़ मात्र, या पुस्तक वाटपावर फाईल बेपत्ता असल्याने संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.

सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून उस्मानाबादमध्ये तत्कालीन राज्य सरकारने बळीराजा चेतना योजना राबविण्यास सुरुवात केली़ यासाठी दरवर्षी काही ठराविक निधी शासनाकडून मिळत होता़ दरम्यान, २०१७-१८ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ बळीराजा चेतना अभियान समितीच्या बैैठकीत शेतकऱ्यांचे मनोबल उंचावून उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रशिक्षण व पूरक पुस्तके वाटप करण्याचा निर्णय झाला़ जिल्हाधिकाºयांनी २ फेब्रुवारी रोजी ही योजना राबविण्यासाठी ७़१९ कोटी रुपये ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालकांकडे वर्ग केले़ मात्र, त्यांनी असमर्थतता दर्शविल्याने जिल्हाधिकाºयांनी पालकमंत्र्यांना पत्राद्वारे ही बाब कळविली़ त्यांनतर त्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे प्रशिक्षणाचे तर पुस्तक वाटपाचे काम तहसीलदारांमार्फत राबविण्याचे निश्चित करण्यात आले़ १६ फेब्रुवारीला रक्कम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आली़ त्यांच्यामार्फत १०२ प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यात ७ हजार १२ शेतकºयांना सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे़ त्यासाठी ९४ लाख रुपये खर्च झाले. उर्वरित ६ कोटी २५ लाख रुपये तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले़

सुजितसिंह ठाकूर : विभागीय चौकशी व्हावी
या प्रकरणाविषयी भाजप आ़सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्तांकडे गुरुवारी तक्रार केली आहे़ या तक्रारीत त्यांनी पुस्तक खरेदीच्या प्रक्रियेविषयी व त्याच्या वाटपाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत़ प्रकरण संशयास्पद असून, त्याची विभागीय चौकशी होण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे़

एकाच महिन्यात पुस्तके खरेदी करणे व ती वाटप करणे, याविषयी शंका घेतली जात आहे़ तक्रारीनंतर जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या सीईओमार्फत चौकशी लावली आहे़

Web Title: The allocation of billions of books is doubtful; The smell of scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.