पाच वर्षांत विकास कामांवर ८६ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:21+5:302021-08-02T04:12:21+5:30

उमरगा : शहरात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांवर गेल्या पाच वर्षात तब्बल ८६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. यातही ...

86 crore on development works in five years | पाच वर्षांत विकास कामांवर ८६ कोटींचा खर्च

पाच वर्षांत विकास कामांवर ८६ कोटींचा खर्च

googlenewsNext

उमरगा : शहरात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांवर गेल्या पाच वर्षात तब्बल ८६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. यातही रस्ते आणि नाल्यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ना शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली, ना नागरिकांच्या अडचणी सुटल्या.

सन २०१६ ते २०२१ या पाच वर्षात महासुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून २७ लाख, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून १५ कोटी ५० लाख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून १९ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ३ कोटी, रस्ता अनुदानमधून १ कोटी ४० लाख, स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेतून ३ कोटी ९ लाख ७४ हजार ८५१, १४ व्या वित्त आयोग योजनेतून १३ कोटी ६९ लाख ५९ हजार ७८०, नाविन्यपूर्ण योजनेतून १३ लाख ५ हजार, विशेष रस्ता अनुदान ५ कोटी, आमदार निधी १ लाख ९४ हजार ३००, प्रधानमंत्री आवास योजनेतून ९ कोटी ३८ लाख, १५ वा वित्त आयोग योजनेतून २ कोटी १ लाख ६७ हजार १९०, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी ठोक अनुदान योजनेतून ९ कोटी,कोव्हिडं १९ निधी साठी २ लाख ४० हजार, असे एकूण ८१ कोटी ५० लाख रुपये विविध योजनेतून पालिकेकडे जमा झाले आहेत. याशिवाय उमरगा पालिकेला विविध मार्गाने वर्षाला जवळपास २ कोटीच्या आसपास उत्पन्न मिळते. त्यापैकी १ कोटीपर्यत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार, वीजबिल व इतर खर्च होतो तर उर्वरित पैसे विकासकामांवर खर्च केले जातात. जवळपास गेल्या पाच वर्षात न. प. फंडातून ५ कोटी निधी विकासकामांवर खर्च केला गेला आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षात तब्बल ८६ कोटी निधी विविध योजनेतून व न. प. फंडातून खर्च केला गेला आहे.

हा निधी आणण्यासाठी सत्ताधाऱ्याबरोबरच विरोधकांनी देखील चांगले प्रयत्न केले. विशेष म्हणजे, विरोधकांनी आणलेला विकास निधी खर्च करण्यास सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही आडकाठी आणली गेली नाही. विरोधी नगरसेवकांच्या वाॅर्डात विकासकामे करण्याचे प्रस्ताव मंजूर केले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. विशेषत: जवळपाच सर्वच वॉर्डात सिमेंट रस्ते व नाल्यांची कामे करण्यात आली. परंतु, याच्या दर्जाबाबत मात्र नागरिकांत ओरड आहे. याव्यतिरिक्त पालिकेची नवीन इमारत, अंतुबळी पतंगे सभागृह, शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व शहरातील स्ट्रीट लाईट ही कामे देखील मार्गी लागली.

Web Title: 86 crore on development works in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.