वाशी तालुक्यात एकाच दिवशी १२० रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:16+5:302021-05-06T04:35:16+5:30

वाशी : तालुक्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढला आहे. कोरोनाच्या आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन चाचण्यांच्या माध्यमातून दिवसभरात सुमारे १२० नवीन ...

120 patients in Vashi taluka on the same day | वाशी तालुक्यात एकाच दिवशी १२० रुग्णांची भर

वाशी तालुक्यात एकाच दिवशी १२० रुग्णांची भर

googlenewsNext

वाशी : तालुक्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढला आहे. कोरोनाच्या आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन चाचण्यांच्या माध्यमातून दिवसभरात सुमारे १२० नवीन रूग्णांची भर पडली. त्यामुळे आता रूग्णसंख्या ५९५ वर जाउन पोहोचली आहे.

मागील काही दिवसांपासून काेराेनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही अनेक लाेक काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळेच की काय, दिवसागणिक संसर्ग वाढत चालला आहे. ५ मे राेजी करण्यात आलेल्या ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांच्या माध्यमातून थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याची क्षमता ३५० रुग्णांची आहे. तर ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेड्स आहेत. शिवाय येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात बाधित रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे़. सद्य:स्थितीत कोरोना केअर सेंटर (क्र.१) मध्ये १२२, काेराेना केअर सेंटर (क्र.२) मध्ये ११६, तर ग्रामीण रुग्णालयात २० असे २५८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत, तर १२९ रुग्ण हाेम आयसाेलेशनमध्ये आहेत. इतर रुग्ण बीड, बार्शी व उस्मानाबाद येथे उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

चाैकट...

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे़त. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर महसूल, पोलीस व नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. असे असतानाही रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

डाॅ. कपिलदेव पाटील, वैद्यकीय अधीक्षक, वाशी

Web Title: 120 patients in Vashi taluka on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.