शिकवायचं ‘काय’ हे तेच तर आहे, ‘कसं’ एवढंच online बदललं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:42 PM2020-07-11T17:42:00+5:302020-07-11T17:50:02+5:30

ऑनलाईन पहिल्यांदाच शिकवत असलेल्या शिक्षकांसाठी काही साध्या-सोप्या युक्त्या

you know how to teach, now try it online with tech help | शिकवायचं ‘काय’ हे तेच तर आहे, ‘कसं’ एवढंच online बदललं!

शिकवायचं ‘काय’ हे तेच तर आहे, ‘कसं’ एवढंच online बदललं!

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठी करून पाहाता येतील असे प्रयोग

गेली किती वर्षे जगभरात चर्चा होती की तंत्रज्ञानामुळे शिकण्याशिकवण्याचं तंत्रच बदलून जाईल. तंत्रज्ञानाचा हात धरुन शिक्षकांना नव्या नजरेनं शिकवावं लागेल. दुरस्थ शिक्षण, ऑनलाइन शिक्षण हे सारं चर्चेत होतंच. पण ते असं अचानक अंगावर येऊन कोसळेल आणि ऑनलाइन शिकवा नाहीतर नोकरीच गमवा, किंवा दुसरा पर्यायच नाही इथर्पयत गोष्टी बदलतील असं शिक्षकांनाच काय कुणालाच वाटलं नव्हतं.
शिक्षकांच्याबाबतीत मात्र ते झालं. शिक्षकांच्या तुलनेत मुलांनी हे ऑनलाइन शिकणं तसं चटकन स्वीकारलं, त्यांना चटचट जमायलाही लागल्या काही गोष्टी.शिक्षकांचा मात्र ताण वाढला.
हा ताण कमी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, शिकवणं तेच आहे, फक्त तंत्र बदललं आहे. शिकवायचं काय हे तसंच आहे, कसं हे बदललं आहे. नवीन तंत्र अंगवळणी पडायलाही तसा वेळ लागतोच, पण इथं वेळच हातात नाही इतक्या वेगानं गोष्टी बदलू लागल्या आहेत.
त्यामुळे आपण जे मुलांना शिकवत होतो, तेच आता स्वत: नव्यानं घोटायची वेळ आली आहे की, बदल स्वीकारा. नव्या काळात घोकंपट्टीला नाही तर प्रयोगाला, चुकत शिकण्याला, नव्या नजरांना, कल्पकतेला, सॉफ्ट स्किल्सला आणि भावनिक ताण हाताळायला जास्त किंमत असेल.
शिक्षकांनाही आता तीच परीक्षा द्यावी लागत आहे.
त्या परीक्षेचा पेपर सोपा जावा म्हणून काही सूत्रं आपण पाहतो आहोतच,  त्यातलीच ही आणखी दोन.

1. ऑनलाइन कम्युनिटी
अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तुम्ही असालच, पण त्याऐवजी नवे प्रयोग जे करतात त्यांची ऑनलाइन कम्युनिटी असेल, ग्रूप असेल तर त्याला जॉइन व्हा. तिथं लोक ज्या आयडिया सांगतात, तोडगे सांगतात, काळज्या, चिंता, अडचणीही सांगतात, त्यातून तुम्हाला तुमची उत्तरं शोधायला मदत होईल.असे ग्रुप्स फार महत्वाचे ठरतात, मदत करतात. त्यातून शिकता येतं आणि आपल्यासाख्या अडचणी जेव्हा इतरांना येतात तेव्हा ते काय करतात , कसा विचार करतात हे कळतं. त्यामुळे असे ग्रूप्स जोडा.
 फेसबूकवर ‘टिचिंग इंग्लीश’ नावाचं पेज आहे. तिथं ऑनलाइन इंग्रजी शिकवण्याच्या अनेक गोष्टी कळतील. असे अनेक पेजेस असतील, ते पहायची सवय लावा.


2. शॉर्ट टर्म/लॉँग टर्म
सगळं एकदम येणार नाही, हे मान्य करा. आता ऑनलाइन शिकवणं हे दीर्घकाळ चालेल, त्याचे पॅटर्न बदलतील हे खरं. पण मग आता आपल्या कामापुरतं, पोटापूरतं काय आहे हे पहा, ते स्किल पटपट शिकून घ्या, चटचट ते अमलात आणा. म्हणजे आपल्याला येतं, असा आत्मविश्वास वाढेल. आणि काही गोष्टी शिकायला वेळ लागेल, त्या शिकतानाचे टप्पे करा.
असं करुन अनेक गोष्टी एकावेळी पण शांतपणो शिकता येतील. कोर्सेरा सारख्या ऑनलाइन मोफत साइट्सवर अनेक कोर्सेस तुम्हाला करता येतील, त्यातुन कौशल्य वाढीला वेग मिळेल.

( संदर्भ: ब्रिटिश कौन्सिल)

Web Title: you know how to teach, now try it online with tech help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.