ऑनलाइन काम करताय, - ते काम चोरीला गेलं तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 03:46 PM2020-05-28T15:46:05+5:302020-05-28T16:27:55+5:30

वर्क फ्रॉम होम करताय? पण तुमचा लॅपटॉप हॅक झाला? तुमचं इमेल अकाउण्ट हॅक झालं, महत्त्वाचा डेटा चोरीला गेला तर. काळजी घ्या, असं होऊ शकतं

Working online - data leak- stay safe, secure your deta | ऑनलाइन काम करताय, - ते काम चोरीला गेलं तर?

ऑनलाइन काम करताय, - ते काम चोरीला गेलं तर?

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाइन काय काय काळजी घ्याल?

 आवेज काझी

वर्कफ्रॉम होम हे तीन शब्द आपल्या आयुष्यात आता कायमचे शिरलेत असं म्हणायला हरकत नाहीत.
कोरोना गेला तरी वर्क फ्रॉम होम आता राहणार. आताच त्याची कलकल व्हायला लागली अशी तक्रार अनेकजण करतात. त्याचे मानसिक, शारीरिक दुष्परिणाम काय याची चर्चा होतेच, मात्र यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती इंटरनेट. अनेकजण ऑनलाइन काम करतात. आणि त्यात जर काही गडबड झाली तर मोठा गहजब होतो.
वर्क फ्रॉम होम करताना, ऑनलाइन काम करताना अनेक कंपन्याही सांगतात, की तुमच्या पासवर्डची, लॉगइनची, अॅण्टी व्हायरसची काळजी घ्या, काही गडबड झाली तर तुम्ही जबाबदार असाल.
डेटा लॉस, डेटा ब्रिचिंग हॅकिंग, रॅन्समवेअर, मालवेअर अटॅक, फिशिंग, स्निफिंग, स्पायवेअर, क्रेडिट-डेबिट कार्डविषयी आर्थिक गुन्हे हे सगळं आताही घडतं आहे. झूम मीटिंगमध्ये अश्लील साहित्य येऊन पडणं, झूम बॉम्बिंग होण्याचा अनुभव काहीजणांना येतो आहे.
तर लॉकडाउन आणि वर्क फ्रॉम होम करताना हे सारं आपल्या वाटय़ाला येऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायला हवी, त्यासंदर्भात आपण जागरूक राहायला हवं. 

ऑनलाइन काय काय काळजी घ्याल?
1) आपल्या घरातील वायफायचं संरक्षण करण्यासाठी व्हीपीएन वापरा. 
त्यामुळे हॅकर्सपासून आपल्या कंपनीची महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित ठेवायला मदत होईल.
ब:याच कंपन्यांनी व्हीपीएनसाठी आपल्या कर्मचा:यांना मदत केली आहे. त्यामुळे  व्हीपीएन शोधा आणि डाउनलोड करून घ्या.
2) काही कार्यालयांनी कर्मचा:यांच्या घरी वर्कडेस्कटॉप बसवले आहेत, परंतु आपण कामासाठी आपला स्वत:चा वैयक्तिक संगणक वापरत असल्यास, एक स्वतंत्न फोल्डर करा आणि त्याठिकाणी फायली सेव्ह करा. जर आपल्या ऑफिसच्या आयटी विभागास आपल्या सिस्टममध्ये रिमोट  लॉगिनला परवानगी असेल तर केवळ आपणास लागणारं जे महत्त्वाचं फोल्डर अॅक्सेस व्हावं त्यालाच अॅक्सेस द्या.  तशी सेटिंग करा. 
3) वैयक्तिक वापरासाठी स्वतंत्न ब्राउझर वापरा. वैयक्तिक ब्राउङिांगसाठी कधीही वर्क ब्राउझर वापरू नका. 
आपल्या ऑटोफिल बारमध्ये माहिती आपोआप येत असल्यामुळे ऑफिस ब्राउझरवर अन्य सर्च टाळा.
4) सर्व ब्राउङिांग हिस्ट्री, ऑटोफिल फॉर्म आणि कुकीज दररोज लॉगआउट होण्यापूर्वी डिलीट करा. तसेच वेळोवेळी बॅकअप घेत चला. कनेक्टिव्हिटी किंवा इतर कारणांमुळे डेटा लॉस होणार नाही.  
5) आपण कार्यालयात असताना सर्व डेटा-हँडलिंग प्रोटोकॉलचे पालन करतो. तसेच घरीपण करा.  आपल्याकडून ऑनलाइन डेटागळती होणार नाही, याची काळजी घ्या. 
6) आपल्या जॉबसाठी जर  सोशल मीडिया वापरणं गरजेचं असेल. तर ते कार्यालयीन कामापुरतं करा.
त्यासाठी आपली पर्सनल सोशल मीडिया खाती वापरू नका.  शक्यतो आपल्या पर्सनल सोशल मीडियाचा वापर भिन्न ब्राउझरवर करा.
7) वर्क फ्रॉम होम करत असताना आपण वापरत असलेल्या संगणकापासून फक्त एका मिनिटासाठी जरी दूर जात असला तरीही आपला संगणक लॉक करा.  रिमोट अॅक्सेस आपण दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. कितीही भरवसा वाटला तरी धोका पत्करू नका. 
8) वर्क फ्रॉम होम करतेवेळी जर आपण  सोशल मीडिया वापरत असताल तर जी माहिती आपण सोशल मीडिया अकाउण्टवर पोस्ट किंवा शेअर करणार आहोत त्याबद्दल खूप काळजी घ्या. 
9) आपल्या कामाची माहिती सोशल मीडियात, मित्रंनाही देऊ नका. घरच्यांनाही अनावश्यक तपशील सांगू नका. आपल्या संवेदनशील अधिकृत फायलींची सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे.
1क्) आपल्या घरातील वर्कस्टेशनची छायाचित्नं कधीही सोशल मीडियावर पोस्ट करू नका. आपण  कार्यक्षमता वाढविण्यासाठी काय तंत्नज्ञान वापरलं, इंटरनेटवर काय सर्च केलं याचे तपशील जाहीर सोशल मीडियात सांगू नका. 
11) आपण आपल्या जोडीदारासोबत  वेगवेगळ्या  शिफ्टमध्ये काम करू शकत असला तरीही आपण आपली संगणक प्रणाली सामायिक करू नये.
12) ऑफिशियल सिस्टमवर कार्य करताना  पर्सनल वापरासाठी स्वतंत्न ब्राउझर, ऑपरेटिंग सिस्टमचा पर्याय आपण यावेळी निवडू शकता.
13) आपला लॅपटॉप, कम्प्युटर ही महत्त्वाची साधनं आहेत, त्यात काही गोपनीय नाही असं वाटत असलं तरी तसं नसतं. आपली कुठलीच माहिती हॅक होऊ नये, यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे. 


( लेखक लातूर येथे पोलीस उपनिरीक्षक असून सायबर क्राइम अभ्यासक आहेत.)

Web Title: Working online - data leak- stay safe, secure your deta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.