वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आईबाबावर रागावला आहात , मग  प्लिज हे वाचा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:43 AM2020-04-10T08:43:54+5:302020-04-10T08:47:05+5:30

आईबाबांवर रागावून कसं चालेल? ते ‘वर्क फ्रॉम होम’ असतील, तर त्यांना काम करावंच लागणार ना आत्ता!

work at home parents & angry -disturb kids, what to do? | वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आईबाबावर रागावला आहात , मग  प्लिज हे वाचा.. 

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आईबाबावर रागावला आहात , मग  प्लिज हे वाचा.. 

Next
ठळक मुद्देफारतर एक करा, आईबाबांना म्हणावं, जरा तुमच्या वर्क फ्रॉम होमला शिस्त लावा.

 माझ्या संतापलेल्या मित्रा,
तुझं पत्र वाचून तुझा संताप मला कळला. माझ्या सगळ्या टीमला कळला, माझ्या टीममध्ये काही मोठे लोक ठेवलेत ना कामाला, ते ही आईबाबा आहेत. त्यांनाही कळला. त्यांच्या तर डोळ्यात पाणीच आलं कारण ते पण वर्क फ्रॉम होम आहेत. त्यांची मुलं पण म्हणो त्यांच्यावर अशीच चिडली आहेत. एकानं तर कट्टी केली होती काल आईशी.
पण आता मला मदत करायची तर त्याच्या आईलाही वर्क फ्रॉम होम करणं भाग आहे. पण त्यालाही तसंच वाटतंय की,  माझ्याआईचं काम काही महत्वाचं नाही. आता सांग, त्याच्या आईचं काम महत्वाचं आहे की नाही?
तुङो कालचे प्रश्न वाचून मी काही मोठ्यांशी स्पेशली ज्यांची मुलं छोटी आहेत, अशा आईबाबांशी बोलले. आणि विचारलं त्यांना की तुम्ही का नाही सुटी घेत, तुमचं काम काय तुमच्या मुलांपेक्षा महत्वाचं आहे का?
तर सगळ्यांनी सांगितलं की, आमचं काम काही आमच्या मुलांपेक्षा महत्वाचं नाहीच्चे, पण काम करायलाच लागणार.
मी विचारलं का?
तर त्यांनी ही कारणं सांगितली.

1. डॉक्टर्स, नर्स, पोलीसकाका, सफाईकाका, बॅँकेत जॉब करणारे काका-काकू, सरकारी नोकरी करणारे काका काकू आणि असे कितीतरीजण आहेत, ते तर त्यांच्या मुलांना घरी ठेवून कामावर जातात. का? तर सगळ्या समाजाला त्यांच्या कामाची मदत आहे. त्यांच्या मुलांनी त्यांना कामावर जाऊच दिलं नाही तर आपल्या घरी पाणी येणार नाही, बाकीचं काय सांगता. त्यामुळे त्यांच्या मुलांना आणि त्यांना पहिले थॅँक्यू म्हणून टाकू!
2. आता जे आईबाबा घरुन काम करतात, त्यांच्या कंपनीला नाईलाजाने त्यांना सांगावं लागलं आहे की घरुन काम करा, कारण काम थांबवता नाही येत.  तशी परवानगी नसते नाहीतर सगळं ठप्प होऊन जाईल. प्रत्येक काम महत्वाचं आहे आणि देश असा बंद केलेला असताना आपलं काम करणं, चांगलं करणं ही जबाबदारीच आहे आईबाबांची.
3. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण आपल्या पिगी बॅँकमध्ये पैसे टाकतो. ते टाकलेच नाही आणि टाकलेले सगळे काढले तर एकदिवस ते संपतीलच ना. तसंच आईबाबांचा पगार झाला नाही तर एटीएममधून येणारे पैसे बंद होतील कारण त्यांच्या बॅँकेतले पैसेच संपतील. मग आपण अन्नधान्य कसं आणणार? जेवणार कसे?
4. मोदीआबा म्हणालेत की आईबाबांना घराबाहेर जाऊ देऊ नका, पण त्यांना काम करु देऊ नका असं नाही म्हणालेत.
5. फारतर एक करा, आईबाबांना म्हणावं, जरा तुमच्या वर्क फ्रॉम होमला शिस्त लावा. ऑफिसच्या वेळेत काम करा, तेव्हा मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. मात्र ती वेळ संपली, की तुम्ही माझे   ! मग जर तुम्ही मोबाइलवर व्हॉट्सअॅप खेळलात, तर चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त.
6. नाहीच आईबाबांनी ऐकलं तर मी आहेच, असा खरमरीत लेख लिहिन ना, की आईबाबा सॉरीच म्हणतील तुम्हाला! कर के देखो.
- तुमची शिस्तीची मैत्रीण ऊर्जा

Web Title: work at home parents & angry -disturb kids, what to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.