फळं आणि भाज्यांचा रंग कसा बनवायचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:19 PM2020-05-29T16:19:03+5:302020-05-29T16:22:29+5:30

तुमचा रुमाल तुम्ही घरच्या घरी रंगवू शकता!.

How to color fruits and vegetables? | फळं आणि भाज्यांचा रंग कसा बनवायचा ?

फळं आणि भाज्यांचा रंग कसा बनवायचा ?

googlenewsNext
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

 

साहित्य: बीटाचे साल, कांद्याचे साल, पालक, जास्वंदीचे पान, संत्र्याचे साल, पाणी आणि एक छोटं पातेलं. 
कृती: 
1) डाय बनवण्यासाठी भाज्यांची सालं आणि इतर साहित्य गोळा करा. 
2) डाय बनवण्यासाठी प्रत्येक गोष्ट किमान 1 कप हवी. 
3) प्रत्येक सालीपासून जो तो रंग तुम्ही तयार करू शकता. 
4) त्यासाठी सगळ्या गोष्टी बारीक चिरून घ्या. तुम्हाला चिरता येत नसेल तर आईबाबांकडून चिरून घ्या. स्वत: प्रयोग करू नका. 
5) आता पातेल्यात एक कुठलाही पदार्थ घ्या. आणि त्यात थोडं पाणी घालून बारीक गॅसवर शिजवा. 
6) चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि ते मिश्रण थंड होऊ द्या. 
7) थंड झाल्यावर गाळणीने किंवा कापडाने पाणी गाळून घ्या. तुमचा रंग तयार आहे. 
8) वर दिलेल्या प्रत्येक पदाथार्साठी ही क्रिया करा. म्हणजे तुमच्याकडे लाल, हिरवा, पिवळा, ऑरेंज, आणि तुम्हाला हवे ते सगळे रंग तयार होतील. 
9) या रंगांना म्हणतात व्हेजिटेबल कलर्स. 


10) तुमच्या एखाद्या रुमालावर तुम्हाला जर या रंगाचा डाय कायमस्वरुपी करायचा असेल तर त्या रुमालाने तुम्हाला हवे तसे फोल्ड करून रुमाल दोऱ्याने बांधून टाका आणि फळांच्या रंगासाठी 4 कप पाण्यात पाव चमचा मीठ घालून त्यात हा बांधलेला रुमाल उकळा. आणि  भाज्यांच्या डाय साठी चार कप पाण्यात 1 कप व्हिनीगर घालून एक तास उकळा. नंतर थंड पाण्यात घाला आणि दोरा सोडवा. तुमचा रुमाल डाय होऊन तय्यार असेल. 


 

Web Title: How to color fruits and vegetables?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.