‘व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठी करून पाहाता येतील असे प्रयोग.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 04:21 PM2020-07-11T16:21:51+5:302020-07-11T16:22:51+5:30

शाळा बंद ही संधी मानून आम्ही केलेला नवा प्रयोग

Experiments to run a 'virtual class'. | ‘व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठी करून पाहाता येतील असे प्रयोग.

‘व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठी करून पाहाता येतील असे प्रयोग.

Next
ठळक मुद्देकरके सिखो

नीलिमा कुलकर्णी , आनंद निकेतन, नाशिक. 
    16 मार्च 2020 रोजी शाळा बंद झाली. उरलेले 15 दिवस परीक्षा होईल या आशेने ठरवलेला अभ्यासक्रम व्हॉटसऐपवर व्हिडिओज किंवा सरावाच्या वर्कशीट्स पाठवून पूर्ण केला. मुलांनीही उत्सुकतेने नवीन माध्यमांचा आधार घेत अभ्यास केला. या काळात अभ्यास करताना काय वाटले, हे जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली मुलांकडून भरून घेतली, त्यातून आम्हालाही बरेच शिकायला मिळाले.
    ऑनलाईन शिक्षणाचा साधकबाधक विचार करता जास्तीत जास्त ऑफलाईन  शिक्षण कसं चालू राहील याचा विचार आम्ही करत होतो.स्वयं प्रेरणोने मुलं शिक्षक नसतानाही काय काय शिकू शकतात याचा विचार करत असताना   ‘कर के सीखो’ या प्रकल्पाची नवीन कल्पना आकार घेऊ लागली.
    कोविड काळातली अपरिहार्यता स्वीकारून त्याकडे एक संधी म्हणून पहायचे आम्ही ठरवले.मुले स्वत:हून काय शिकतात,त्यांची प्रेरणा कशात आहे, त्यांच्या आवडीच्या विषयात झोकून देऊन काम करू शकतात का ,गरज पडल्यास कुणाची मदत घ्यायची ते ठरवू शकतात का हे शोधण्याची हीच योग्य वेळ होती. नाहीतरी शाळेत प्रत्येकाच्या आवडीनुसार,क्षमतेनुसार ,गतीनुसार शिकवणो शक्य होते का? विषयांची चौकट व काही बंधने असतातच!
    या प्रकल्पात मुलांनी आपल्या आवडीचे विषय निवडून,ठरवलेला साचेबद्ध अभ्यासक्रम नसताना स्वत:च शिकणो अभिप्रेत होते.नमुन्यादाखल काही विषय येथे देत आहे. उदा. निसर्गातील एखाद्या सजीवाच्या हालचालीचा अभ्यास, एखादे तत्व वापरून वैज्ञानिक खेळणी बनवणो, घराचे बजेट समजून घेणो, कमी करणो,नवीन भाषा शिकणो इ.


मुलांना गरज पडेल तिथे मदत देण्याची एक योजना आखून संपूर्ण जून महिना मुलांनी प्रकल्प करायचा असे मांडले गेले. प्रत्येकाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन मिळावे , विषय ठरवायला, पुढे न्यायला मदत मिळावी म्हणून मित्रत्वाच्या नात्याने मदत करायला  ‘सांगाती’ नेमून दिले.शाळेतले शिक्षक, पालक,माजी विद्यार्थी आणि हितचिंतक असे सगळे सांगाती म्हणून ठरले. प्रत्येकाकडे 3/4 मुले होती. त्यांच्याशी फोन किंवा व्हिडिओकॉल मार्फत गप्पा , आवश्यक तिथे पालक व सांगातींची मदत असे स्वरूप ठरले. त्यासाठी आधी मुलांना संभाव्य विषयांची यादी, सांगाती, सूचना , पालकांसाठी सूचना हे सर्व पाठवण्यात आले. प्रकल्प समजावून सांगण्यासाठी झूम मीटिंग,व्हिडिओ, पीपीटी ही माध्यमे वापरली. 
    वेळ -जागा, साहित्य, क्षमता यांचा अंदाज घेत मुलांनी आपापल्या आवडीच्या विषयाचा अभ्यास सुरु केला आहे.त्यासाठी माहिती मिळवणो,अनेकांशी बोलणो, कौशल्य मिळवणो,अडचणी सोडवणो व उद्दिष्टांपयर्ंत पोहोचण्याचा प्रय} करणो या दिशेने त्यांचा प्रवास सुरु आहे. अर्थात यात अंतिम परिणाम महत्वाचा नसून प्रक्रिया महत्वाची आहे हे पालक व मुलांच्या मनावर बिंबवण्यात आले आहे!


 

Web Title: Experiments to run a 'virtual class'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.