डुडल आर्ट :रेघोट्यातून असं बनवा  तुमचं  डुडल ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:05 PM2020-04-08T15:05:19+5:302020-04-08T15:06:45+5:30

भिंतीवर?.. नको नको, कागदावर करायचे उद्योग!

DIY- how to make a doodle? | डुडल आर्ट :रेघोट्यातून असं बनवा  तुमचं  डुडल ! 

डुडल आर्ट :रेघोट्यातून असं बनवा  तुमचं  डुडल ! 

googlenewsNext
ठळक मुद्देबघा मस्त डिझाइनचं तुमचं डुडल तयार

तुम्हाला को-या  कागदावर रेघोटय़ा मारायला आवडतात? किती मज्जा येते ना, कोरे कागद, पांढ-या  भिंती.. नको
नको भिंतींवर नको नाहीतर आईबाबा रागावतील. मोठय़ा माणसांना भिंतींवर रेघोटय़ा मारायची गंमत कध्धी कळतच नाही. त्यांना वाटतं तुम्ही मुलं भिंती
घाण करता; पण कधी तरी ना त्यांच्या हातात रंग देऊन त्यांना भिंतींवर चित्र काढायला सांगितलं पाहिजे म्हणजे त्यातली गम्मत कळेल.
बरं ते जाऊ द्या. तर आजपण डुडल आर्ट करूया.
साहित्य :
कोरा पांढरा किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचा कागद,
पेन्सिल, रंग, ब्रश

कृती :
1. तुम्ही निवडलेल्या कागदावर पेन्सिलीने पाहिजे तशा
रेघोटय़ा, गोलगोल आकार, त्रिकोण, चौकोन काढा.
2. काढताना सगळं एकात एक गुंतू देत.
3. मग हे सगळं वेटोळं करून झालं की त्यात असंख्य लहान-मोठे आकार तयार होतील.
4. त्या आकारांमध्ये छान छान आवडीचे रंग भरा.
5. कुठल्या रंगाशेजारी कुठला रंग भरा, असं काहीही
सांगणार नाही.
6. तुम्हाला पाहिजे ते रंग, तुमच्या मर्जीने भरून टाका.
7. आणि बघा मस्त डिझाइनचं तुमचं डुडल तयार होईल.
8. मग त्यातल्या एक-दोन आकारांना नाक डोळे काढून
मस्त पैकी लूक द्या.

Web Title: DIY- how to make a doodle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.