coronavirus: क्वॉरन्टाइन करतात, म्हणजे नेमकं काय करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:11 PM2020-03-27T18:11:34+5:302020-03-27T18:16:05+5:30

कोरोना व्हायरस पसरल्यापासून सतत काही शब्द तुमच्या कानावर पडत असतील. उदा. क्वॉरन्टाइन, आयसोलेशन, सेल्फ क्वारंटाइन. म्हणजे नक्की काय?

coronavirus: What do quarantines mean, exactly? | coronavirus: क्वॉरन्टाइन करतात, म्हणजे नेमकं काय करतात?

coronavirus: क्वॉरन्टाइन करतात, म्हणजे नेमकं काय करतात?

Next
ठळक मुद्देहा आजार स्थानिक नाही. तो  चीनच्या वुहान प्रांतात निर्माण झाला आणि जगभर पसरला.

- मुक्ता चैतन्य

कोरोना व्हायरस पसरल्यापासून सतत काही शब्द तुमच्या कानावर पडत असतील. उदा. क्वॉरन्टाइन, आयसोलेशन, सेल्फ क्वारंटाइन. म्हणजे नक्की काय, हे आज समजून घेऊ या.

समजा, जिथे कोरोनाचा संसर्ग आहे अशा एखाद्या देशातून एखादी व्यक्ती  आली असेल किंवा कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली असेल तर त्या व्यक्तीला 14 दिवसांसाठी क्वॉरन्टाइन केलं जातं.

ह्या व्यक्तीला  कदाचित संसर्ग झाला आणि लक्षणं दिसून टेस्ट पॉङिाटिव्ह आली तर त्या व्यक्तीपासून इतरांना लागण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते. संसर्ग झालेली व्यक्ती इतरांमध्ये वावरली तर आजाराचा फैलाव झटपट होऊ शकतो; त्यापेक्षा परदेशातून आलेल्या व्यक्तींना वेगळं ठेवणं सोपं असतं ना? जेव्हा आईला खूप सर्दी होते तेव्हा ती काय म्हणते, फार जवळ येऊ नकोस, तुलाही सर्दी होईल. तसंच काहीसं. परदेशातून येणा:या लोकांना का क्वॉरन्टाइन?

कारण हा आजार स्थानिक नाही. तो  चीनच्या वुहान प्रांतात निर्माण झाला आणि जगभर पसरला. भारतातही तो परदेशातून आलेल्या लोकांच्या माध्यमातूनच पसरला आहे. म्हणून ही काळजी. आता आणखी एक शब्द आहे आयसोलेशन.

म्हणजे व्यक्तीला इतरांपासून पूर्णत: दूर - अलग- आयसोलेट करून ठेवणं. 

 

Web Title: coronavirus: What do quarantines mean, exactly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.