coronavirus : आयसोलेशन करतात, म्हणजे नेमकं काय करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 04:59 PM2020-03-27T16:59:44+5:302020-03-27T17:03:01+5:30

क्वॉरण्टाइन करतात, म्हणजे इतरांपासून वेगळं ठेवतात. नंतरचा टप्पा म्हणजे आयसोलेशन.

 coronavirus: isolation, so what exactly do they do? | coronavirus : आयसोलेशन करतात, म्हणजे नेमकं काय करतात?

coronavirus : आयसोलेशन करतात, म्हणजे नेमकं काय करतात?

Next
ठळक मुद्देआयसोलेशन म्हणजे जगापासून दूर.

आयसोलेशन म्हणजे काय? ज्या लोकांना या क्वॉरण्टाइन काळात आजाराची लक्षणं दिसून येतात आणि त्यांच्या टेस्ट पॉङिाटिव्ह येतात, म्हणजे कोरोनाच्या व्हायरसने शरीरात एंट्री केलेली आहे हे पक्कं होतं त्यांना मग आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं जातं. आयसोलेशन म्हणजे जगापासून दूर. या  वॉर्डमधल्या रुग्णांचा इतर कुणाशीही संपर्क येत नाही. घरचेही नाही.

डॉक्टर्स, नर्सेस या वॉर्ड्समध्ये रुग्णांची योग्य काळजी घेतात. आणि मग ते बरे झाले की त्यांना घरी सोडतात. त्यामुळे यात घाबरून जाण्यासारखं काहीही नाही. फक्त हात स्वच्छ धुवा, सरकार देतं आहे त्या सगळ्या सूचना नीट पाळा. तुमच्या नेहमीच्या डॉक्टरकडे जा. मस्त राहा.

Web Title:  coronavirus: isolation, so what exactly do they do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.