झुरळांनो चले जाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 07:20 AM2020-05-31T07:20:00+5:302020-05-31T07:20:02+5:30

घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

cockroaches go back- science experiment. | झुरळांनो चले जाव...

झुरळांनो चले जाव...

Next

                
साहित्य:
कणिक, बोरीक पावडर, गूळ, पाणी, भांडे.
कृती :
1. एका भांड्यात एक डावभर कणिक घ्या. त्यात अर्धा डाव गूळ घाला. तसेच त्यात पाव डाव बोरीक पावडर घाला. 
2. कॅरमचा पृष्ठभाग गुळगुळीत राखण्यासाठी बोरीक पावडर वापरतात.
3.  हे सारे मिश्रण थोडे थोडे पाणी घालून एकजीव करा. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा. 
4. झुरळांच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर थोड्या थोड्या अंतरावर संध्याकाळी गोळे ठेवा.
5.  दुसर्?या दिवशी सकाळी झुरळांचा वावर कमी झालेला दिसेल. 


या गोळ्यांचा प्रभाव पाच-सहा महिने राहातो.
बोरीक पावडरमुळे झुरळांच्या अंगातील पाणी कमी होऊन ती अशक्त होतात. माणसांना तसेच अन्य पाळीव प्राण्यांना फारसा त्रस होत नाही.
 

Web Title: cockroaches go back- science experiment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.