'ही' आहे जगातली सर्वात मोठी गुहा; खळखळून वाहणारी नदी, घनदाट जंगल आणि खूप काही दडलंय आत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 04:22 PM2019-09-09T16:22:09+5:302019-09-09T16:39:10+5:30

तुम्ही आयुष्यात अनेक गुहा पाहिल्या असतील, पण व्हिएतनाममध्ये जशी गुहा आहे तशी नक्कीच पाहिली नसेल. ही गुहा जगातली सर्वात मोठी गुहा मानली जाते.

Worlds biggest cave interesting facts about hang son doong cave Vietnam | 'ही' आहे जगातली सर्वात मोठी गुहा; खळखळून वाहणारी नदी, घनदाट जंगल आणि खूप काही दडलंय आत...

'ही' आहे जगातली सर्वात मोठी गुहा; खळखळून वाहणारी नदी, घनदाट जंगल आणि खूप काही दडलंय आत...

googlenewsNext

तुम्ही आयुष्यात अनेक गुहा पाहिल्या असतील, पण व्हिएतनाममध्ये जशी गुहा आहे तशी नक्कीच पाहिली नसेल. ही गुहा जगातली सर्वात मोठी गुहा मानली जाते. कारण या गुहेच्या आत एक वेगळं विश्व तयार झालं आहे. तसेच या गुहेत असे आवाज येतात की, ते ऐकून कुणाचाही थरकाप उडेल. 

(Image Credit : Social Media)

९ किलोमीटर लांब, २०० मीटर रूंद आणि १५० मीटर उंच या गुहेचं नाव आहे हॅंग सोन डूंग. या गुहेच्या आत झाडी, जंगल, नदी सगळंच आहे. लाखो वर्ष जुन्या या गुहेला २०१३ मध्ये पहिल्यांदा पर्यटकांसाठी उघडण्यात आलं होतं. मात्र, एका वर्षात इथे केवळ २५० ते ३०० लोकांनाच जाण्याची परवानगी मिळते. 

(Image Credit : www.travelandleisure.com)

या गुहेचा शोध १९९१ मध्ये 'हो खानह' नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने लावला होता. पण त्यावेळी पाण्याचा मोठा आवाज आणि गुहेतील अंधारामुळे कोणीही गुहेच्या आता जाण्याची हिंम्मत करू शकले नव्हते.

(Image Credit : YouTube)

आंतरराष्ट्रीय स्तरावर २००९ मध्ये या गुहेला ओळख मिळाली, जेव्हा ब्रिटिश रिसर्च असोसिएशनने पहिल्यांदा जगाला पहिल्यांदा या गुहेची झलक दाखवली. नंतर  २०१० मध्ये वैज्ञानिकांनी एक २०० मीटर उंच भिंत पार करून गुहेच्या आत जाण्याच्या रस्त्याचा शोध लावला होता. या भिंतीला 'व्हिएतनामची भिंत' असंही म्हणतात.

(Image Credit : telegraph.co.uk)

दरवर्षी ऑगस्ट महिन्याआधी पर्यटक या गुहेत जाऊन परत येतात. कारण त्यानंतर गुहेतील पाण्याचं प्रमाण वाढतं. गुहेच्या आत जाण्यासाठी एका व्यक्तीचं तिकीट साधारण २ लाख रूपये इतकं आहे.

(Image Credit : oxalis.com.vn)

गुहेच्या आत जाणाऱ्या पर्यटकांना आधी सहा महिने ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना कमीत कमी १० किलोमीटर पायी चालणे आणि सहा वेळा रॉक क्लायम्बिंग शिकवलं जातं. त्यानंतरच त्यांना गुहेत जाता येतं.

Web Title: Worlds biggest cave interesting facts about hang son doong cave Vietnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.