UAE Exempts visa fee for tourists aged 18 and under between July 15 to September 15 | आता दुबईला फिरायला जाणं झालं स्वस्त, ऑफर लिमिटेड...लगेच करा प्लॅन!
आता दुबईला फिरायला जाणं झालं स्वस्त, ऑफर लिमिटेड...लगेच करा प्लॅन!

अनेक कपल्स आपल्या मुलांना घेऊन परदेशात फिरायला जायचं असतं, पण अनेकदा लहान मुलांच्या व्हिसासाठीही मोठी रक्कम भरावी लागत असल्याने अनेक प्लॅन कॅन्सल होतो. मात्र जर तुम्ही परिवारासोबत दुबईला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. दुबईत फिरायला जाणं आता स्वस्त झालं आहे. दुबई टुरिज्मने पालकांसोबत येणाऱ्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना व्हिसा फ्री केलं आहे.

(Image Credit : ShortList Dubai)

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १५ जुलै ते १५ सप्टेंबर २०१९ दरम्यान पालकांसोबत येणाऱ्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पर्यटकांना आता व्हिसा फ्री करण्यास आलं आहे. अशात जे परिवार दुबईत थीम पार्क, वॉटर पार्क आणि इतर गोष्टींचा आनंद घेण्यासाठी जाणार आहेत. त्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. याने तुमचा अधिकचा खर्चही वाचणार आहे आणि सोबतच सर्वांना एन्जॉय करता येणार आहे.

(Image Credit : DookyWeb)

ही ऑफर प्रत्येक देशाच्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला यासाठी केवळ कोणत्याही लायसेंस्ड ट्रॅव्हल एजन्सीकडे आधीच अप्लाय करावं लागेल. दुबई टुरिज्मने हे पाऊल दुबईला फॅमिली टुरिज्मसाठी बेस्ट डेस्टिनेशनच्या रूपात वाढवण्यासाठी उचललं आहे. दुबई हे जगातलं वेगाने वाढणारं एक पर्यटन स्थळ आहे. जिथे लोक वेगवेगळ्या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी येतात.


Web Title: UAE Exempts visa fee for tourists aged 18 and under between July 15 to September 15
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.