जर तुम्ही हिवाळयाच्या वातावरणात आपल्या पार्टनरसोबत कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल. किंवा नवीनच  लग्न झालेल्या लोकांना आपल्या पत्नी सोबत हनिमूनला जायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला  खास ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही हनिमूनचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. बोरा-बोरा फ्रेंच पॉलिनेशिया मधलं एक आयलॅण्ड आहे. जगातील रोमॅन्टीक ठिकाणांपैकी हे एक ठिकाणं आहे. चला तर मग जाणून घेऊया बोरा बोरा आयलॅंण्डबद्दल.

Image result for bora bora island(image credit-www.trendingnews.com)

या  आयलॅण्डला रोमॅन्टिक आयलॅण्ड सुद्धा म्हटलं जातं. हनिमून इन्जॉय करण्यासाठी अत्यंत सुंदर असं हे ठिकाणं आहे.  लांबचलांब सामसूम असलेल्या  बीच पासून १९ किलोमिटरच्या अंतरावर एक द्वीप आहे. ज्याचा आकार हार्ट शेपसारखा आहे. म्हणूनच  या ठिकाणाचे नाव  'रोमॅन्टिक आइलॅंड' असं ठेवले आहे. 

Image result for bora bora island( image credit- trending news)

या ठिकाणी फुलांशी निगडित एक अनोखी प्रथा आहे. जर कुठल्याही महिलेने आपल्या उजव्या कानाच्या मागे फुल लावले याचा अर्थ असा की ती मुलगी रिलेशनशीप मध्ये आहे.  ( हे पण वाचा-  पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी ठिकाण शोधत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या)

Image result for girl wear flower(image credit-Nicobar)

जर त्या मुलीने डाव्या कानाच्या मागे फुल लावले तर ती मुलगी सिंगल आहे.  त्यामुळे कोणताही मुलगा तिच्याकडे अप्रोच करू शकतो. ( हे पण वाचा-ब्ल्यू सिटीचे सौंदर्य पाहण्यासाठी 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या )

Image result for bora bora island( image credit- trips to discover)

या ठिकाणी खूप सुंदर बीच आहेत. जवळपास ४० लाख ज्वालामुखी फुटल्यानंतर हे आयलॅंण्ड तयार झाले आहे. अनेक वर्षीपुर्वी ही जागा खूप सुमसाम होती. आता या जागेचे रूप पालटले आहे. तुम्ही बोरा बोरा बीचला गेल्यानंतर अनेक एक्टीव्हिटीजचा आनंद घेऊ शकता.  स्नॉकेलिंग, ड्रायविंग, जेट स्किंगचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे.  तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या जंगलांमध्ये तुम्हाला  निसर्गसौंदर्य पाहता येईल. अशा  ठिकाणी जर तुम्ही हनिमूनचा आनंद घ्यायला जाल तर  पार्टनर नक्की खूश होईल.

Web Title: Trip of 'Romantic Island' will be best for honeymoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.