(Image Credit : Auramah Valley)

हिमाचलमधील खरं सौंदर्य अनुभवायचं असेल तर शिमला हिल स्टेशन नेहमीच बेस्ट ऑप्शन ठरतो. तुम्हीही ट्रिप प्लॅन करत असाल तर शिमला टूर प्लॅन करू शकता. शिमल्यामधील नारकांडा शहर म्हणजे, निसर्ग सौंदर्याचा उत्तम नमुनाच. पण हे शहर जास्त प्रसिद्ध नसल्यामुळे अनेकजण येथे जाणं टाळतात. पण तुम्ही शिमल्याला जाणार असाल तर नारकांडाचा तुमच्या डेस्टिनेशन लिस्टमध्ये समावेश करायला विसरू नका. निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आणि मनाला शांती देण्यासाठी हे ठिकाण फायदेशीर ठरतं. येथे पर्यटकांची जास्त वर्दळ नसते. तसेच येथील निसर्गसौंदर्य म्हणजे, पृथ्वीवरील स्वर्गचं... 

(Image Credit : Tripoto)

अनेक ठिकाणं आहेत पाहण्यासारखी

नारकंडा हे भारत आणि तिबेटच्या सीमेलगत असलेलं एक ठिकाण. येथे निसर्गसौंदर्यासोबतच अनेक प्राचीन मंदिर, दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं आणि बगिचे पाहायला मिळतील. तसेच येथे तुम्हाला काही प्रमाणात तिबेटच्या संस्कृतीचं दर्शनही घडेल. यांमध्ये महामाया मंदिर, हाटु पीक, थानेदार मंदिर आणि बगिचे, अमेरिकन सफरचंदाच्या बागा आणि उंचावरून कोसळणारे झरे यांसारख्या निसर्गरम्य गोष्टीं प्रसिद्ध आहेत. 

(Image Credit : Thrillophilia)

यावेळी येथे नक्की जा...

जर तुम्ही शिमल्याच्या आजूबाजूच्या भागांमध्ये फिरण्यासाठी गेला असाल आणि पौर्णिमा असेल तर नारकंडाला जाणं अजिबात टाळू नका. वेळात वेळ काढून या ठिकाणाला भेट द्या. कारण पौर्णिमेच्या चांदण्यात नारकांडाचं सौंदर्य आणखी खुलतं. हिमालयाच्या पांढऱ्या शुभ्र पर्वतरांगा आणि त्यांच्या कुशीत वसलेलं घनदाट जंगल पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये न्हाऊन निघतं. हा अनुभव खरचं एखादी परिकथा सत्त्यात उतरल्याप्रमाणे असतो. एकदा तरी हा अनुभव घेण्यासाठी नारकांडाला भेट द्या. 

(Image credit : Holiday Travel)

हे स्पॉर्ट्स ठरतील बेस्ट 

नारकंडामध्ये तुम्ही स्किइंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. येथे पडणारा रिमझिम पाऊस आणि त्यामुळे दूरवर पसरलेली हिरवळ तुम्हाला प्रसन्न करते. तुम्हाला जर हिमवृष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर डिसेंबर ते मार्चमध्ये नारकंडाला भेट देणं फायदेशीर ठरतं. तसेच ट्रेकिंग आणि सायकलिंगसाठी उन्हाळा फायदेशीर ठरतो. तसेच तुम्ही येथे शॉर्ट टिपही प्लॅन करू शकता. 


Web Title: Narkanda is a beautiful hill station in shimla district in himachal pradesh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.