आयुष्यभर आठवणीत राहील असाच आहे Elephant Falls, जाणून घ्या कुठे आहे हा धबधबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 11:35 AM2019-07-02T11:35:59+5:302019-07-02T11:36:52+5:30

ढगांचं घर म्हटल्या जाणाऱ्या मेघालयात पावसात फिरायला जाणं कधीही न विसरता येणारं ठरू शकतं.

Must visit Elephant Falls in Meghalaya in Monsoon | आयुष्यभर आठवणीत राहील असाच आहे Elephant Falls, जाणून घ्या कुठे आहे हा धबधबा!

आयुष्यभर आठवणीत राहील असाच आहे Elephant Falls, जाणून घ्या कुठे आहे हा धबधबा!

googlenewsNext

पावसात भिजण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि जेव्हा तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत असता तेव्हा तर आनंद दुप्पट होतो. त्यामुळे पावसाळ्यात फिरायला जाण्याऱ्यांची संख्या जास्त असते. तसा तर पावसाचा आनंद सगळीकडे घेता येतो. पण काही ठिकाणे अशी आहेत, जिथे पावसाचा तुम्हाला वेगळा अनुभव घेता येतो. ढगांचं घर म्हटल्या जाणाऱ्या मेघालयात पावसात फिरायला जाणं कधीही न विसरता येणारं ठरू शकतं.

पावसात हे ठिकाण एक जादुची नगरीच भासावी. इथे कितीतरी ठिकाणांवर तुम्ही पावसाच्या रिमझिम सरींसवे फिरण्याचा आनंद घेऊ शकता. तसे तर मेघालयात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत, मात्र पावसाळ्यात Elephant Falls हे ठिकाण सगळ्यांच्या पसंतीचं आहे. डोंगरातून खळखळत कोसळणारा हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये दिसतो. इतर वेळीही धबधबा सुंदर दिसतोच पण या दिवसात याचं सौंदर्य अनेक पटीने वाढतं.

डोंगरातून खाली धो-धो कोसळणाऱ्या पाण्यातून निघणारी वाफ सगळीकडे धुक्यासारखी परसते. हा नजारा कोणत्याही जादूपेक्षा कमी नसतो. पण हा नजारा तुम्हाला केवळ पावसाळ्यातच बघायला मिळू शकतो.

त्यासोबतच तुम्ही 'उमियाम तलाव'ची अलहदा कथा पर्यटकांना अधिकच आकर्षित करते. असे मानले जाते की, स्वर्गातून दोन बहिणी मेघालयात फिरायला आल्या होत्या. दोघींचं एकमेकिंवर फार प्रेम होतं. पण रस्त्यात एक बहीण हरवली, तर दुसरी तिच्या आठवणीत खूर रडली. हा तलाव तिच्या अश्रूंपासून तयार झाल्याची आख्यायिका आहे.

तुम्ही जर पावसाळ्यात स्वर्गाचा आनंद घेण्याच्या तयारीत असाल तर मेघालयाला आवर्जून भेट देऊ शकता. हा पावसाळा तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहील हे नक्की.

Web Title: Must visit Elephant Falls in Meghalaya in Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.