हटके डेस्टिनेशन आहे 'हनोई'; शॉपिंगपासून फिरण्यापर्यंत अनेक गोष्टींची असेल मेजवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:37 PM2019-10-07T16:37:03+5:302019-10-07T16:44:23+5:30

परतीच्या पावसानंतर हळूहळू वातावरणातील गारवा जाणवू लागला असून अनेक लोक हिवाळ्यात देशी-विदेशी ठिकाणी फिरण्यासाठी प्लॅन करत असतात. अशातच आझ आम्ही तुम्हाला एका ठिकाणाबाबत सुचवणार आहोत.

Must see places for tourist to visit and travel in hanoi | हटके डेस्टिनेशन आहे 'हनोई'; शॉपिंगपासून फिरण्यापर्यंत अनेक गोष्टींची असेल मेजवाणी

हटके डेस्टिनेशन आहे 'हनोई'; शॉपिंगपासून फिरण्यापर्यंत अनेक गोष्टींची असेल मेजवाणी

googlenewsNext

परतीच्या पावसानंतर हळूहळू वातावरणातील गारवा जाणवू लागला असून अनेक लोक हिवाळ्यात देशी-विदेशी ठिकाणी फिरण्यासाठी प्लॅन करत असतात. अशातच आझ आम्ही तुम्हाला एका ठिकाणाबाबत सुचवणार आहोत. येथए तुम्ही फिरायला जाऊ शकता.

(Image Credit : Smart Cities World)

दक्षिण आशियामधील संस्कृती आणि वास्तूकलेसाठी ओळखलं जाणारं ठिकाण म्हणजे, 'हनोई'. लाल नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं पाच हजार वर्षांपूर्वीचं हे शहर विएतनामच्या राजधानीचं शहर आहे. सर्वात सुंदर आणि शांत देश म्हणून ओळखलं जाणारं हनोई आराम आणि शांतंतेसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. 

(Image Credit : Bangkok Attractions.com)

फिरण्यासाठी एका सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल तर हनोई तुमच्यासाठी उत्तम ठिकाण असेल. येथे तुम्ही फार कमी पैशात बीच, लेक आणि जंगल सफारीची सैर करू शकता. युद्ध आणि शौर्य यांसारख्या ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असणारं हे शहर फिरण्यासाठी एक क्लासी पर्याय ठरतं. 

(Image Credit : World Travel Guide)

दीड किलोमीटर लांब आणि जवळपास आठशे मीटर रूंद असणाऱ्या हॉन कीम सरोवराने या शहराचं विभाजन केलं आहे. त्यामुळे या शहरांना पगोडा आणि महल या नावांनी ओळखलं जातं. या शहराची सर्वात खास गोष्ट म्हणजे, येथील रस्ते फार सुंदर आणि स्वच्छ आहेत. येथील रस्ते शहराचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मदत करतात. तसेच या शहरामध्ये अनेक बाजार असल्यामुळे अनेक लोक या शहराला बाजारांचा समूह असं म्हणतात. येथे तुम्हाला हाताने तयार केलेल्या वस्तूंसोबतच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपर्यंत सगळ्या वस्तू मिळतात. हनोईतील सिल्क आणि कॉफी अत्यंत प्रसिद्ध आहे. खास गोष्ट म्हणजे, पर्यटकांना हे शहर अजिबात महागड वाटत नाही. 

(Image Credit : TravelTriangle)

हनोई शहराती एक आणखी खास गोष्ट म्हणजे, हनोईमध्ये विकेन्ड दरम्यान उत्साहाचं वातावरण असतं. खासकरून येथील बाजारांमध्ये येणाऱ्या लोकांच्या सेफ्टीसाठी शुक्रवारी संध्याकाळपासून ते रविवार रात्रीपर्यंत येथे येणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात येते. काही वेळ शॉपिंग केल्यानंतर येथे नृत्य, एरोबिक्स, विविध खेळ, कलात्मक कार्यक्रम यांचे आयोजनही केलं जातं. 

Web Title: Must see places for tourist to visit and travel in hanoi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.