Monsoon travel tips 5 reasons why you must visit rajasthan in monsoon season | दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच
दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच

पावसाळ्यात अनेकदा लॉन्ग विकेंडच्या सुट्टीच्या सुट्ट्यांची संधी मिळते. पण देशाच्या अनेक ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करणं अजिबात शक्य होत नाही. अशातच आपण सगळ्या सुट्ट्या घरात बसूनच वाया घालवतो. परंतु, यावर्षी असं अजिबात करू नका. कारण आम्ही तुम्हाला मान्सूनमध्ये राजस्थान फिरण्याच्या 5 फायद्यांबाबत सांगणार आहोत. हे जाणून घेतल्यानंतर पावसाळ्यामध्ये तुम्ही राजस्थान फिरण्याचा प्लॅन नक्की कराल. 

1. अरावलीमधील मनाला भूरळ घालणारी हिरवळ 

पाऊस, डोंगर आणि चहूकडे पसरलेली हिरवळ. असं दृश्य आपल्या सर्वांना पाहायची इच्छा असते. पावसाच्या पाण्यामुळे झाड आणखी चमकदार होतात. अशातच अरावलीची रोड ट्रिप आणखी मजेशीर होते. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ट्रिप वाढवून पुढे माउंट आबूपर्यंत जाऊ शकता. 

2. सरोवरांची सैर मन प्रसन्न करेल 

राजस्थानला नेहमी उन्हाळा आणि वाळवंटासाठी ओळखलं जातं. परंतु, एकदा तुम्ही पावसाळ्यात येथे नक्की भेट द्या. येथील सरोवरांमधील स्वच्छ पाणी आणि आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा तुम्हाला खरचं प्रसन्न करतील. 

3. राजस्थानची शान असलेले किल्ले

राजस्थानमध्ये अनेक किल्ले आहेत. पण येथे असणाऱ्या उष्ण वातावरणामुळे अनेक लोक किल्ले पाहायला जातात, परंतु फार काळ थांबणं पसंत करत नाहीत. पण पावसाळ्यात हे किल्ले पाहण्याची गंमत काही औरच... पावसाच्या पाण्यामुळे किल्ल्यांवर जमा जालेली माती निघून जाते आणि त्यांचं सौंदर्य आणखी बहरतं. 

4. मान्सूनमध्ये सणांचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण 

श्रावणाच्या महिन्यात हिन्दू कॅलेंडरनुसार, अनेक सण साजरे करण्यात येतात. यादरम्यान दहीहांडी, रक्षाबंधन यांसारखे सण येतात. हे सण राजस्थानमध्ये धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. अशातच मान्सूनमध्ये येथे जाऊन येथील संस्कृतीचाही आनंद घेऊ शकता. 

5. गर्दी नसल्यामुळे फिरण्याचा आनंद होईल दुप्पट

जेव्हा पर्यटक जास्त असतात, त्यावेळी फिरण्याचा आनंद पुरेपूर घेता येत नाही. परंतु मान्सूनमध्ये लोक आपल्या घरांतून बाहेर पडणं शक्यतो टाळतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी फार अनुभवता येत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये फिरण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणांवरील सौंदर्याचा पुरेपूर आनंद लूटता येतो. 


Web Title: Monsoon travel tips 5 reasons why you must visit rajasthan in monsoon season
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.