ख्रिसमससाठी गोव्याला जायचा प्लॅन करताय? मग हे नक्की वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 12:34 PM2019-12-18T12:34:20+5:302019-12-18T13:28:40+5:30

ख्रिसमस आणि नविन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहीले आहेत.

Know People first choice goa for christmas new year celebration | ख्रिसमससाठी गोव्याला जायचा प्लॅन करताय? मग हे नक्की वाचा 

ख्रिसमससाठी गोव्याला जायचा प्लॅन करताय? मग हे नक्की वाचा 

Next

(Image credit- Holidify)

ख्रिसमस आणि नविन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहीले आहेत. जर तुम्ही नविन वर्ष साजरा करण्यासाठी कुठे जाण्याचं प्लॅनिंग केलं नसेल तर आजच तयारीला लागा. कारण मायानगरी मुंबईतील अधिकाधिक लोकांनी गोव्याला जाण्याची तयारी केली आहे. टूर ऑपरेटर यांच्या रिपोर्टनुसार २२ डिसेंबर ते जानेवारी पर्यंत सगळ्यात जास्त थंडीची आणि नविन वर्षाची मजा घेण्यासाठी लोकांनी गोव्याला प्राधान्य दिलं आहे.

(image credit- Thomas cook travel blog)

ख्रिसमस आणि नविन वर्ष साजरं करण्यासाठी टेंट कल्चरला नवविवाहीत जोडप्यांनी पसंती दिली आहे. तर हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी लोकांनी २ महिने आधीच बुकिंग केलं आहे. तसंच अजूनही टेन्ट कल्चरचा अनुभव घेण्यासाठी खूप तिकीट्स बुक केले जात आहेत.


 (image credit- The culture trip.com)

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन कोवळ्या ऊन्हाचा आनंद घेण्यासाठी तसंच खूप मजा-मस्ती करण्यासाठी लोकांनी गोवा या पर्यटन स्थळाला पसंती दिली आहे. गोव्याला २२ डिसेंबरपासून ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू होतं. वेगवेगळ्या ट्रॅवल ऑपरेट्सनी आत्तापर्यंत ८०० पेक्षा जास्त टूर बूक केले आहेत. गोव्यातल्या अनेकविध बीचवर लोक डान्स, म्यूझिक आणि विविधतेने परिपूर्ण असलेल्या गोव्याच्या सी फूडचा आनंद घेतात. 

(Image credit-Indian holiday.com)

ख्रिसमसच्यावेळी गोव्यातल्या चर्चमध्ये वाजणारे संगीत आणि ख्रिसमस ट्री पाहून वेगळ्याच दुनियेत गेल्याचा अनुभव मिळतो. हिवाळ्यात गोव्यातील वातावरण पाहण्यासारखे असते. गोव्याची समुद्र आणि चौपाटीचा  देखावा फार सुंदर असतो. गोव्यात  ख्रिसमस  आणि न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी येथे देशभरातुन अनेक पर्यटक येतात. तसेच गोव्याव्यतिरीक्त जोधपूर, उदयपूर या ठिकाणांना पर्यटकांनी पसंती दर्शवली आहे. 

Web Title: Know People first choice goa for christmas new year celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.