आजही अनेकांना माहीत नाही 'हे' सुंदर बेट, कधीकाळी इथे ठेवले जात होते कुख्यात कैदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 02:47 PM2020-02-11T14:47:39+5:302020-02-11T14:54:39+5:30

या बेटावर जाण्याची इच्छा असणारे लोक जगभरात कमी नाहीत. पण रोज केवळ ४२० पर्यटकांनाच या बेटावर जाण्याची परवानगी मिळते.

Brazil fernando de noronha island once used to be prison of merciless criminals | आजही अनेकांना माहीत नाही 'हे' सुंदर बेट, कधीकाळी इथे ठेवले जात होते कुख्यात कैदी!

आजही अनेकांना माहीत नाही 'हे' सुंदर बेट, कधीकाळी इथे ठेवले जात होते कुख्यात कैदी!

googlenewsNext

(All Image Credit : en.wikipedia.org)

ब्राझीलच्या फर्नांडो डी नोरोन्हा बेट समूहावरील पांढऱ्या वाळूचे किनारे आणि हिरव्यागार झाडांनी झाकले गेलेले डोंगर अजूनही सर्वांना माहीत नाहीत. या बेटावर जाण्याची इच्छा असणारे लोक जगभरात कमी नाहीत. पण रोज केवळ ४२० पर्यटकांनाच या बेटावर जाण्याची परवानगी मिळते. ब्राझीलच्या उत्तर-पूर्व तटापासून साढे तिनशे किलोमीटर अंतरावरील या २१ बेटांच्या समूहाच्या भागाला १९८८ मध्ये अभायारण्य घोषित करण्यात आलं होतं.

मुख्य बेट हे २८.५ वर्ग किलोमीटर परिसरात आहे. तर यांची निर्मिती ज्वालामुखीच्या डोंगरातून झाली आहे. याच्या आजूबाजूला २० लहान बेटे आहेत. ही बेटं नेहमीच अशी नव्हती. १६व्या शतकात हा बेट समूह पोर्तुगालचा समुद्र प्रवासी फर्नांडो डी नोरोन्हा याने शोधला होता. त्यानंतर डच आणि पोर्तुगालतील सैन्य या बेटांचा वापर करू लागले. पण १७०० मध्ये हा बेट समूह तुरूंगात बदलण्यात आला.

२०व्या शतकाच्या मध्यात येथील मुख्य बेटाचा वापर तुरूंगासारखा केला जात होता आणि इथे ब्राझीलमधील सर्वात कुख्यात गुन्हेगारांना ठेवलं जात होतं. खूनी, चोर, बलात्कारी आणि राजकीय कैद्यांना शिक्षा भोगण्यासाठी या बेटावर पाठवलं जात होतं.

फर्नांडो डी नोरोन्हाला आतापर्यंत सर्वात शांत ठिकाण मानलं जात होतं. पण आता बऱ्याच लोकांनी त्याची माहिती झाल्याने अनेक पर्यटक इथे भेट देतात स्वर्गासारख्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध या बेटाला ब्राझीलचे लेखक ग्रस्टाओ पेनाल्वा यांनी 'फोरा डो मुंडो' असा उल्लेख केला होता. याचा अर्थ होतो 'या विश्वाच्या बाहेर'. 

आजच्या टेक्नॉलॉजीच्या आणि इंटरनेटच्या जगातही हे ठिकाण फार दूर मानलं जातं. हे ठिकाण वेगळं असल्याकारणाने याचा वापर तुरूंगासारखा करण्यात येत होता. चांगल्या व्यवहाराचे कैदी आपल्या परिवारातील सदस्यांना इथे पाठवण्याची विनंती करत होते. ते इतर कैद्यांच्या सेलपासून वेगळे राहत होते.

पुढे येथील तुरूंग १९५७ मध्ये बंद करण्यात आलं. पण काही कैदी त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावरही येथून परत गेले नाहीत. त्यांनी या बेटावरच आपलं घर तयार केलं. आजही त्यांचे वंशज इथे राहतात. फर्नांडो डी नोरोन्हाला येणारे पर्यटक आजही त्या काळातील तुरूंग बघू शकतात. पण त्यांची स्थिती फारच वाईट आहे.


Web Title: Brazil fernando de noronha island once used to be prison of merciless criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.