ऑक्टोबरमध्ये सोलो ट्रिपचा विचार करत असाल तर 'ही' 3 ठिकाण ठरतील बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:47 PM2019-10-01T13:47:32+5:302019-10-01T13:47:54+5:30

ऑक्टोबरचा महिना म्हणजे, गुलाबी थंडीची चाहूल देणारा महिना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा वातावरणात फिरण्याची गंमत काही औरच...

Best place to solo visit in october | ऑक्टोबरमध्ये सोलो ट्रिपचा विचार करत असाल तर 'ही' 3 ठिकाण ठरतील बेस्ट

ऑक्टोबरमध्ये सोलो ट्रिपचा विचार करत असाल तर 'ही' 3 ठिकाण ठरतील बेस्ट

Next

ऑक्टोबरचा महिना म्हणजे, गुलाबी थंडीची चाहूल देणारा महिना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा वातावरणात फिरण्याची गंमत काही औरच... जर तुम्ही सोलो ट्रिप लव्हर असाल आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबाबत सांगणार आहोत. गुलाबी थंडीमध्ये या ठिकाणांचं सौंदर्य आणखी बहरतं. जाणून घेऊया ऑक्टोबरमध्ये सोलो ट्रिपसाठी कोणती ठिकाणं बेस्ट ठरतात त्याबाबत... 

बहरलेलं सिक्किम... 

(Image Credit : sentinelassam.com)

तसं पाहायला गेलं तर सिक्किम फार सुंदर आहे. परंतु, ऑक्टोबरमध्ये याचं सौंदर्य आणखी बहरल्याचं पाहायला मिळतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ आणि वातावरणातील गारवा मन प्रसन्न करतो. त्यामुळे तुम्हीही एकटं फिरण्याच्या विचारात असाल तर सिक्किमला नक्की भेट द्या. 

(Image Credit : TravelTriangle)

पावसाळ्यानंतर शिलॉन्ग दिसतं फार सुंदर 

मेघालयामध्ये असलेलं शिलॉन्ग उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. परंतु पावसाळ्यानंतर शिलॉन्गच्या सौंदर्यात आणखी भर पडते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेली सोलो ट्रिप तुमच्या नक्कीच लक्षात राहिल. येथे असणाऱ्या शिलॉन्ग पीकमधून तुम्ही संपूर्ण शहराचं दृश्य पाहू शकता. याव्यतिरिक्त लेडी हैदरी पार्क, कॅलॉन्ग रॉग आणि वार्डस सरोवर या ठिकाणांना भेट देऊ शकता. 

कुन्नूरही ठरतं बेस्ट डेस्टिनेशन 

उटीनंतर दुसरं सर्वात मोठं पर्वतीय स्थळ म्हणजे, तमिळनाडूतील कुन्नूर. खासकरून ट्रेकिंगसाठी हे ठिकाण उत्तम समजलं जातं. जर तुम्हालाही सोलो ट्रिप आणि ट्रेकिंगचा शौक असेल तर कुन्नूरला नक्की भेट द्या. येथे अनेक पार्क आहेतच, त्याचबरोबर येथे अनेक सरोवरं आहेत.

Web Title: Best place to solo visit in october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.