पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?; मग 'या' ठिकाणी जाणं टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 12:56 PM2019-07-12T12:56:28+5:302019-07-12T13:00:16+5:30

पावसाळ्याची आपल्यापैकी बहुतेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवसांमध्ये वातावरणातील गारवा अत्यंत अल्हाददायी असतो.

Avoid travelling these places during monsoon in india | पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?; मग 'या' ठिकाणी जाणं टाळा

पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?; मग 'या' ठिकाणी जाणं टाळा

Next

पावसाळ्याची आपल्यापैकी बहुतेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवसांमध्ये वातावरणातील गारवा अत्यंत अल्हाददायी असतो. उन्हाळ्यातील हैराण करणाऱ्या उकाड्यानंतर असा गारवा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. अनेकजण पावसाळ्यात फिरण्यासाठी मान्सून ट्रिप प्लॅन करत असतात. भारतातील अनेक ठिकाणं या दिवसांमध्ये हिरवी शाल पांघरल्याप्रमाणे दिसतात. केरळ किंवा राणीखेत यांसारखी ठिकाणी पावसाळ्यामध्ये भेट देणं म्हणजे खरचं सुख... पण याव्यतिरिक्त काही अशी ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यामध्ये जाणं थोडसं रिस्की ठरू शकतं. त्यामुळे जर तुम्ही पावसाळ्यामध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबा... आणि या ठिकाणांना पावसाळ्यामध्ये भेट देणं शक्यतो टाळाच... त्यामुळे जर मान्सूनमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर थोडा विचारपूर्वक करा...

मुंबई 

मुंबईच्या पावसाच्या चर्चा आपण सर्वचजण ऐकत असतो. मुसळधार पावसामुळे अनेकदा मुंबापूरीची तुंबापूरी होते. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचतं. ज्यामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत होतं. अशातच ट्रॅफिकमुळे तुमचा फिरण्याच्या आनंदावर विरझण पडतं. 

चेन्नई

चेन्नईमध्ये पावसाळ्यामध्ये फिरणं अत्यंत अवघड होतं. या शहराचीही परिस्थिती थोडीफार मुंबईप्रमाणेच होते. अनेकदा पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत होतं. त्यामुळे जर तुम्ही मान्सून ट्रिपसाठी चेन्नईला जाण्याचा विचार करत असाल तर चेन्नईचा विचारच करू नका. 

उत्तराखंड 

उत्तराखंडमध्ये पावसाळ्यामध्ये ढगफुटी आणि लँन्डस्लाइडसारख्या अत्यंत गंभीर आणि नैसर्गिक आपत्तीजनक घटना घडत असतात. पावसामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये उत्तराखंडाचा समावेश होतो. येथील सर्वाधिक रस्ते डोंगर पोखरून तयार करण्यात आलेले आहेत. अशातच पावसाळ्यामध्ये येथे अनेक अपघातही होत असतात. 

सिक्किम 

फिरण्यासाठी शौकीन असणाऱ्या व्यक्तींना सिक्किमचं सौंदर्य नेहमीच भूरळ घालत असतं. परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी ते सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुकं असतं. त्यामुळे येथे रस्त्यावर अनेक अपघातही होत असतात. 

याव्यतिरिक्त दार्जिलिंग, उडिसा, मेघालय, तमिळनाडू आणि केरळ यांसारखी अनेक ठिकाणं आहेत. या ठिकाणांना जर पावसाळ्यामध्ये भेट देण्याचा विचार करत असाल तर एकदा तेथील हवामानाचा अंदाज घेऊन त्यानंतरच तिथे जावं की नाही ते ठरवणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Avoid travelling these places during monsoon in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.