नीक आणि जो या नवदाम्पत्यानं एका वेगळ्याच पद्धतीनं हनिमून साजरं केलं. आपल्या लग्नादिवशी परिधान केलेल्या ड्रेसमध्येच 33 देश फिरुन हनिमून साजरं केलंय. 

 

पहिल्या 10 महिन्यात थायलंड, माऊंट एव्हरेस्ट(नेपाळ), चीनची भिंत, बार्सिलोना (स्पेन), दुबई (युएई), रोम (इटली), फ्रान्स, तुर्की, इंडोनेशिया, जापान, ग्रीस, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, सर्बिया, द.आफ्रिका, इस्रायल, सिंगापूर, श्रीलंका आणि स्वित्झर्लंड या देशांना भेटी दिल्या. 


जो असं म्हणते की, माझं आपल्या नात्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे केवळ एकदाच लग्नाचा पोशाख परिधान करणं हे मला शक्य नव्हत. 
जग हे खूप मोठं असून आपण केवळ एकाच जागी कसं काय राहू शकतो, असेही जो म्हणते. 

निक आणि जो यांनी मॅरी मी इन ट्रॅव्हल या नावाने इंस्ट्राग्रामवर अकाऊंटही सुरू केले आहे. ज्याला सध्या 46 हजार फॉलोवर्स आहेत. 

या कपलने भारतालाही भेट दिली. प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहल या वास्तूजवळ फोटोशूटही केलं. यावेळी भारतीय संस्कृतीचं पालनही या जोडप्यानं केलं. 

 


 


  

 

 


Web Title: amazing things, They travels 33 country for Honeymoon after marraige
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.