काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवार, ३० जुलै रोजी धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या काही दिवसांत जलसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
गेल्या पाच-सहा दिवसांपासून मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरूच असून, प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरावरील महासांगवीचा शंभर टक्के, तर संगमेश्वर मध्यम प्रकल्प ५७.३० टक्के भरला आहे. ...
वीर धरणाच्या वरच्या परिसरात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे वीर धरणातून चंद्रभागा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरीत पोहोचल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. ...
नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...
नांदुर मधमेश्वर येथील धरणातून गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ११ हजार ७९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी आज शुक्रवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. ...