नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे. ...
गुरुवारी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून ठामपानेही नऊशेचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईत ही ६४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी एक रुग्ण हा भिवंडीत आढळल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ६२७७ कंत्राटी कामगार काम करत आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईची कामगिरी उंचावण्यामध्ये या कामगारांचा मोठा वाटा आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून हे कंत्राटी कामगार दिवस-रात्र परिश्रम करत आहेत. ...
बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. मार्केटमध्ये दिवसरात्र परिश्रम घेणा-या फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांना ही पंधरा दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ...
लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या ...