बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेच ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीचा सण आला. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या फुलांची मागणी वाढली आहे. एरवी २०० ते २५० रुपये किलो रुपये दराने मिळणारी शेवंतीची फुलं मंगळवारी गौरी आवाहनाच्या दिवशी बाजारात तब्बल ५०० ते ६०० रुपय ...
पान, विड्याला कात चुना लावल्याशिवाय पानाचा विडा रंगत नाही; परंतु सणासुदीमुळे कात चुना लावल्याविनाच पानाचा विडा रंगला आहे. मागणी वाढल्याने नागवेली पान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, यामुळे तरी शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे. ...