दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:18 AM2019-09-16T00:18:17+5:302019-09-16T00:18:19+5:30

दारूसाठी पैसे न दिल्याने विकास बिदलान, अमर तुशांबर, गौतम बुंबक आणि चैनू अशा चौघांनी निलेश यादव (१८, रा. इंदिरानगर, ठाणे) या तरुणाला दारूच्या नशेतच लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

Young man beaten for failing to pay for alcohol | दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला केली मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला केली मारहाण

Next

ठाणे : दारूसाठी पैसे न दिल्याने विकास बिदलान, अमर तुशांबर, गौतम बुंबक आणि चैनू अशा चौघांनी निलेश यादव (१८, रा. इंदिरानगर, ठाणे) या तरुणाला दारूच्या नशेतच लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इंदिरानगर, रूपादेवी पाडा क्रमांक २, रायगड गल्ली येथील रहिवासी यादव हे १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली येथे कॅटरिंगच्या कामासाठी गेले होते. ते १४ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी परतत होते. त्यावेळी रूपादेवी पाडा क्रमांक २ येथे आले असता, त्यांच्या ओळखीचे विकास बिदलान यांच्यासह चौघा जणांच्या टोळक्याने त्यांना ‘हमको दारू पिला’ असे म्हणत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून या चौघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विकासने लोखंडी सळईने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी इतर काही मित्रांनी दाखल केले. याप्रकरणी यादव यांनी चौघांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या चौघांचाही शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Young man beaten for failing to pay for alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.