यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस येणार समुद्राला मोठी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:56 PM2021-05-05T23:56:56+5:302021-05-05T23:57:06+5:30

२५ व २६ जूनला सावधानतेची गरज

This year's monsoon will have 18 days of high tide | यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस येणार समुद्राला मोठी भरती

यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस येणार समुद्राला मोठी भरती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : पावसाळ्यात यावर्षी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस आहेत. मुंबईत जर या दिवशी जास्त पाऊस झाला तर उधाण भरतीमुळे पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाऊ शकत नाही, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस, वेळ आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याची उंची पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी कळविले आहेत. याठिकाणी भरतीच्या पाण्याची उंची दिलेली आहे. ही लाटांची उंची नव्हे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
 

(१) बुधवार, २३ जून     : सकाळी १०-५३ भरतीची उंची ४.५७ मीटर.
(२) गुरुवार, २४ जून     : सकाळी ११-४५ भरतीची उंची ४.७७ मीटर.
(३) शुक्रवार , २५ जून     : दुपारी १२-३३ भरतीची उंची ४.८५ मीटर.
(४) शनिवार, २६ जून     : दुपारी १-२३ भरतीची उंची ४.८५ मीटर.
(५) रविवार, २७ जून     : दुपारी २-१० भरतीची उंची ४.७६ मीटर.
(६) सोमवार, २८ जून     : दुपारी २-५७ भरतीची उंची ४.६१ मीटर.
(७) शुक्रवार, २३ जुलै     : सकाळी ११-३७ भरतीची उंची ४.५९ मीटर.
(८) शनिवार, २४ जुलै     : दुपारी १२-२४ भरतीची उंची ४.७१ मीटर.
(९) रविवार, २५ जुलै     : दुपारी १-०७ भरतीची उंची ४.७३ मीटर.
(१०) सोमवार, २६ जुलै     : दुपारी १-४८ भरतीची उंची ४.६८ मीटर.
(११) मंगळवार, २७ जुलै     : दुपारी २-२७ भरतीची उंची ४.५५ मीटर.
(१२) मंगळवार, १० ॲागस्ट     : दुपारी १-२२ भरतीची उंची ४.५० मीटर.
(१३) बुधवार, ११ ॲागस्ट     : दुपारी १-५६ भरतीची उंची ४.५१ मीटर.
(१४) रविवार, २२ ॲागस्ट     : दुपारी १२-०७ भरतीची उंची ४.५७ मीटर.
(१५) सोमवार, २३ ॲागस्ट     : दुपारी १२-४३ भरतीची उंची ४.६१ मीटर.
(१६) मंगळवार, २४ ॲागस्ट     : दुपारी १-१७ भरतीची उंची ४.५६ मीटर.
(१७) बुधवार, ८ सप्टेंबर     : दुपारी १२-४८ भरतीची उंची ४.५६ मीटर.
(१८) गुरुवार, ९ सप्टेंबर     : दुपारी  १-२१ भरतीची उंची ४.५४ मीटर.

Web Title: This year's monsoon will have 18 days of high tide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.