'त्या' घटनेमुळे कल्याण पोलीस सतर्क, सुरक्षेसंदर्भात महिलांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:29 PM2019-12-03T16:29:58+5:302019-12-03T16:30:16+5:30

हैदराबादमध्ये पीडितेबरोबर घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात चीड व्यक्त केली जात आहे,

Welfare police alert to 'that' incident, talk to women about security | 'त्या' घटनेमुळे कल्याण पोलीस सतर्क, सुरक्षेसंदर्भात महिलांशी चर्चा

'त्या' घटनेमुळे कल्याण पोलीस सतर्क, सुरक्षेसंदर्भात महिलांशी चर्चा

Next

ठाणेः हैदराबादमध्ये पीडितेबरोबर घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात चीड व्यक्त केली जात आहे, पण या पुढे कोणी दुसरी तशी पीडिता बनू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. कल्याण पोलिसांच्या वतीने पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी काही सामाजिक महिलांशी सुरक्षेबाबत चर्चा केली. महिलांकडून त्यांची मते देखील घेण्यात आली.

हैदराबादमध्ये घडलेली घटना कोणासोबत कधीही आणि कुठे ही घडू शकते, त्यामुळे आपल्याला नेहमी सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे, असे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले. तसेच 'दामिनी पथक' आणि 'महिला सतर्कता टीम' तसेच सुरक्षेसंदर्भात सर्व माहिती देखील देण्यात आली, म्हणजे वेळ पडल्यावर त्याचा वापर करता येईल.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी अशा कठीण प्रसंगी सर्वात आधी 100 या नंबरवर फोन करण्याची सूचना दिली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण म्हणाले की महिलांनी सहजरीत्या कोणावर ही विश्वास टाकू नये सतर्क राहावे. यावेळी छाया वाघमारे, पुष्पा रत्नपारखी, अनिता पाटील, नंदिनी साळवे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
 

Web Title: Welfare police alert to 'that' incident, talk to women about security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस