कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:55 AM2021-02-25T04:55:46+5:302021-02-25T04:55:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिका प्रशासन यशस्वी झाले असून, मास्क न वापरणाऱ्यांवर दोनवेळा दंडात्मक ...

Warning to file a case if Corona violates the rules | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिका प्रशासन यशस्वी झाले असून, मास्क न वापरणाऱ्यांवर दोनवेळा दंडात्मक कारवाई, तर तिसऱ्यांदा थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी बुधवारी दिला. दरम्यान, महापौर, उपमहापौर, अतिरिक्त आयुक्त यांनीही पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

उल्हासनगर महापालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाल्याचा दावा आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी केला. त्यांनी मंगळवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकल्याने त्यांनी प्रसिद्धपत्रक काढून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. गेल्या दोन दिवसांत १३ व १५ रुग्ण आढळले असून शांतीनगर येथील २०० बेडच्या साई प्लॅटिनियम रुग्णालयाला कोविड रुग्णालय घोषित केले. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास प्रथम २०० रुपये, दुसरी वेळ ५०० रुपये, तर तिसरी वेळ थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

शहरातील दुकानासमोर फक्त पाच ग्राहक उभे राहतील, याची काळजी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम २ हजार, दुसरीवेळ ५ हजार तर तिसरी वेळ थेट एफआरआय अथवा दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. लग्नाचे हॉल, लॉन्स, बंदिस्त सभागृह व खुले मैदान येथे नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम २० हजार रुपये दंड आणि दुसरी वेळ सीलबंदची कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २ हजार दंड अथवा गुन्हा दाखल करण्यात येईल. लग्न व इतर सभारंभास जास्तीत जास्त ५० तर अंत्यविधीसाठी २० नागरिकांची मर्यादा घालून देण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व तंबाखू सेवनास बंदी घालण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान, मंगळवारी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर व शिवसेना शहरप्रमुख यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन नियम पाळण्याचे आवाहन केले.

.....

महापालिका लॅबमध्ये २४ तास कोरोना चाचण्या

महापालिकेने गेल्या दोन महिन्यांपूर्वी अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन करून कोरोनासह इतर चाचण्या करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आता २४ तास कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली. कोविड रुग्णालय साई प्लॅटिनियमसह आयटीआय, तहसील, रेडक्रॉस येथील आरोग्य केंद्र, तसेच टाटा आमंत्रण येथील काेविड सेंटरही सज्ज असल्याचे सांगितले.

.................

Web Title: Warning to file a case if Corona violates the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.