संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकाच दिवसात केली ८९२ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 08:14 PM2020-05-29T20:14:39+5:302020-05-29T20:20:13+5:30

एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतांना संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांमध्येही कमालीची वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी एकाच दिवसात अशा ८९२ जणांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

 Violation of curfew: Thane Rural Police took action against 892 vehicles in a single day | संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकाच दिवसात केली ८९२ वाहनांवर कारवाई

वाहतूक शाखेची मीरा रोड आणि भार्इंदरमध्ये कारवाई

Next
ठळक मुद्देतीन लाख १२ हजारांचा दंड वसूलवाहतूक शाखेची मीरा रोड आणि भार्इंदरमध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हयातील अनेक भागांमध्ये कडक कारवाई केली आहे. बुधवारी एकाच दिवसात मीरा रोड आणि भार्इंदर या दोन विभागांमध्ये वाहतूक नियंत्रण शाखेने विनाकारण फिरणा-या ८९२ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून तीन लाख १२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.
ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून अनेक भागांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले. तसेच परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी सोडण्याची प्रक्रीया सुुरु झाल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करण्यास अनेकांनी सुरुवात केली. मीरा रोड आणि भार्इंदर या विभागात २७ मे रोजी वाहतूक शाखेने एकाच दिवसात अशा ८९३ जणांविरुद्ध खटले दाखल केले. यामध्ये साथ प्रतिबंधक कायद्यानुसार ३४ जणांना अटक करण्यात आली. या ८९३ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Violation of curfew: Thane Rural Police took action against 892 vehicles in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.