प्रसिद्ध भावगीत गायक व चतुरंगचे कार्यकर्ते विनायक जोशी यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 05:23 PM2020-02-16T17:23:04+5:302020-02-16T17:26:11+5:30

विविध सांगितिक कार्यक्रमाचे संकल्पक व ज्येष्ठ भावगीत गायक व डोंबिवली चतुरंगचे प्रमुख कार्यकर्ते विनायक जोशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज निधन झाले.

Vinayak Joshi, a renowned singer and activist of Chaturang, passed away | प्रसिद्ध भावगीत गायक व चतुरंगचे कार्यकर्ते विनायक जोशी यांचे निधन 

प्रसिद्ध भावगीत गायक व चतुरंगचे कार्यकर्ते विनायक जोशी यांचे निधन 

googlenewsNext

डोंबिवली - विविध सांगितिक कार्यक्रमाचे संकल्पक व ज्येष्ठ भावगीत गायक व डोंबिवली चतुरंगचे प्रमुख कार्यकर्ते विनायक जोशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज निधन झाले. इंदूर येथील कार्यक्रम आटोपून येत असताना त्यांना प्रवासातच झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. स्वरभाव यात्रा, सरींवर सरी, बाबुल मोरा, चित्रगंगा, गीत नवे गाईन मी, तीन बेगम आणि एक बादशहा यासारख्या असंख्य सांगितीक कार्यक्रमांचे संकल्पक म्हणून विनायक जोशी यांनी काम केले होते. 

विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. एस. के. अभ्यंकर यांचेकडे झाले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांचेकडे सुगम संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर गजल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. इंदूर येथे श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त योजलेल्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते डोंबिवलीस परतत होते. वाटेतच धुळ्याजवळ त्यांना अस्वस्थ वाटू लागले, आणि हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले.

बँक ऑफ इंडियात नोकरी करणारे विनायक जोशी काही महिन्यातच निवृत्त होणार होते. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीचे ते विश्वस्त होते. चतुरंग प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. किरण जोगळेकर यांच्या निधनानंतर डोंबिवली चतुरंगला बसलेला हा मोठा धक्का आहे. येत्या जुलै महिन्यात सुधीर फडके यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने एका सर्वस्वी नव्या कार्यक्रमाची जुळवाजुळव त्यांनी सुरू केली होती. त्यांचेमागे पत्नी पूर्णिमा, मुलगा गंधार आणि सून गेयश्री आहेत.

Web Title: Vinayak Joshi, a renowned singer and activist of Chaturang, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.