पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतरांच्या पिल्लाला वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 10:48 PM2022-01-17T22:48:40+5:302022-01-17T22:49:01+5:30

वसईत संक्राती निमित्ताने मागील दोन तीन दिवस झाले आकाशात ठीक ठिकाणी पतंग उडत असल्याचे चित्र जरी दिसत असले तरी मानवजातीसाठी हा सण आनंदाचा असेल मात्र या आनंदात नागरिकांकडून उडवले जाणारे  पतंग व त्याचे मांजे निष्पाप छोट्या छोट्या पक्षासाठी जीवघेणे ठरताना दिसत आहेत

Vasai Virar firefighters rescue pigeon cub trapped in moth bite | पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतरांच्या पिल्लाला वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले जीवदान

पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतरांच्या पिल्लाला वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले जीवदान

googlenewsNext

ir="ltr">आशिष राणे,वसई

वसईत संक्राती निमित्ताने मागील दोन तीन दिवस झाले आकाशात ठीक ठिकाणी पतंग उडत असल्याचे चित्र जरी दिसत असले तरी मानवजातीसाठी हा सण आनंदाचा असेल मात्र या आनंदात नागरिकांकडून उडवले जाणारे  पतंग व त्याचे मांजे निष्पाप छोट्या छोट्या पक्षासाठी जीवघेणे ठरताना दिसत आहेत

असाच एक जीवघेणा प्रकार वसईत माणिकपूर भागात रविवारी दुपारी घडला आहे या घटनेत चक्क पतंगाच्या मांज्यामुळे  एका कबुतराच्या छोट्याशा पिल्लाला  वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी सोडवून जीवदान दिले आहे

वसई पश्चिमेच्या माणिकपूर रस्त्यावर एका कबुतराच्या छोट्या पिल्लाच्या पायामध्ये पतंगाचा मांजा अडकला होता त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकाने याची सविस्तर माहिती नजीकच्या वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवली असता सन सिटी येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले आणि तासाभराच्या शर्तीच्या प्रयत्नाने त्या कबुतराच्या छोट्या पिल्लाची  सुखरूप सुटका केली 

Web Title: Vasai Virar firefighters rescue pigeon cub trapped in moth bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.