पुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 08:22 PM2020-01-23T20:22:12+5:302020-01-23T20:27:05+5:30

येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या मोर्चेकरांची भेट घेण्यात आली नाही

Until rehabilitation, the workers are determined to lay B-bone in front of the Collector's office | पुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार

पुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धार

Next
ठळक मुद्देशासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडलेघराची जागा नावे करून देण्याची जोरदार मागणीपुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धार

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नेतावली येथील १३ कातकरी कुटुंबियांना बेघर केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने येथील ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मोर्चा काढून धरणे आंदोलन सुरू केले. घराची जागा नावे करून देण्याची जोरदार मागणी करून पुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
       येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या मोर्चेकरांची भेट घेण्यात आली नाही. यामुळे संतापलेल्या या मोर्चेकरांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बिºहाड मांडून बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावर प्रशासन काय निर्णया घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
       नेतावली येथील कातकरी समाजाच्या १३ आदिवासी कुटुंबियांचा हा बि-हाड मोर्चाचे आता बेमुदत बिºहाडासह धरणे आंदोलनात रूपांतर झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत तरी श्रमजीवींचे हे धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलकांकडून आदिवासी माणूस ढोर नाय ... माणूस हाय ... माणूस हाय, माणूसकीची भीक नको... हक्क हवा... हक्क हवा, या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून गेला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुली पेटवून अन्न शिजवण्याची तयारी देखील या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

      बेघर झालेल्या या अदिवासी कातकरी कुटुंबांचे तत्काळ पुर्नवसन करा, कातकरी उत्थान अभियानातंर्गत कुळ कायदा १९४८ चे कलम १६ व १७ प्रमाणे घराखालील जागा त्यांच्या नावे करावी, बेघर केलेल्या आदिवासींना तात्पुरती निवासाची व्यवस्था करा, विकासक व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे आदी मागण्या यावेळी आंदोलकांकडून निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. यावेळी या कुटुंबाचा प्रश्न सोडविण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्यास २६ जानेवारी या प्रजास्ताक दिनी १३ कुटुंबिये या श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध व्यक्त करणार असल्याची भोईर यांनी दिली.

Web Title: Until rehabilitation, the workers are determined to lay B-bone in front of the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.