तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:48+5:302021-05-17T04:38:48+5:30

ठाणे : समुद्रकिनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. त्याचा फटका काहीअंशी ठाणे जिल्ह्यालाही बसत आहे. रविवारी दिवसभर आकाश ...

Unseasonal rains in the district due to cyclone Taukte | तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

Next

ठाणे : समुद्रकिनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. त्याचा फटका काहीअंशी ठाणे जिल्ह्यालाही बसत आहे. रविवारी दिवसभर आकाश ढगाळलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटात पावसाच्या हलक्या सरी आणि दिवसभर वादळी वारा अनुभवायला मिळाला. रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसादरम्यान ठाणे, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर मुरबाड परिसरात बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

जिल्ह्यात ‌ठिकठिकाणी वीज खंडित झाल्याच्या घटना घडल्या. गेल्या काही महिन्यात प्रथमच रविवारी जिल्ह्यात उन्हाची दाहकता जाणवली नाही. वादळी वारा, पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आणि संचारबंदीच्या अडथळ्यांमुळे नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले. यादरम्यान ठाणे शहर परिसरात तीन झाडे उन्मळून पडली व दोन झाडे धोकादायक स्थितीत उभी असल्याचे निदर्शनास आले.

अंबरनाथ तालुक्यात रात्रीच्या पावसादरम्यान २५ झाडे पडली. दोन ठिकाणी छतावरील पत्रे उडून गेले. या घटनेत कोठेही जीवितहानी झालेली नाही. रविवारी दिवसभर झाडे हटविण्याचे काम पार पडले. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात १२ झाडे पडली. यादरम्यान जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांत वादळवारा काही प्रमाणात असला तरी, पाऊस पडला नसल्याचे येथील तहसीलदारांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Unseasonal rains in the district due to cyclone Taukte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.