मीरा भाईंदर महापालिकेच्या २ प्रभाग समिती सभापती पदी भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 08:04 PM2020-10-23T20:04:37+5:302020-10-23T20:04:53+5:30

उर्वरित ४ समिती सभापती साठी २७ रोजी निवडणूक 

Unopposed selection of BJP candidates for the post of 2 ward committee chairpersons of Mira Bhayander Municipal Corporation | मीरा भाईंदर महापालिकेच्या २ प्रभाग समिती सभापती पदी भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड

मीरा भाईंदर महापालिकेच्या २ प्रभाग समिती सभापती पदी भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या ६ प्रभाग समिती सभापती पदांसाठी २७ ऑक्टॉबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स ने निवडणूक होत  आहे. यातील भाईंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती २ वर भाजपच्या रक्षा भूपताणी तर काशिमीरा परिसर प्रभाग समिती ६ मध्ये भाजपच्या सचिन म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध झाली आहे . तर अन्य ४ समिती मध्ये देखील भाजपाचे बहुमत आहे . 

मीरा भाईंदर मध्ये भाजपाचे ६१ नगरसेवक असले तरी त्यातील आमदार गीता जैन व अन्य तीन नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत विरोधात भूमिका घेतली होती . शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे कोरोना मुळे निधन झाल्याने सेना नगरसेवकांची संख्या २१ झाली आहे . त्यातील सेनेचे अनिता पाटील यांनी बंडखोरी करून भाजपाची साथ धरली आहे . काँग्रेस प्रणित आघाडी मध्ये १२ नगरसेवक असून त्यातील सारा अक्रम महापौर निवडणुकीवेळी गैरहजर होत्या . त्यातच माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपातील अनेक नगरसेवकांनी आघाडी उघडली आहे . स्वतः जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी मेहतांची मनमानी खपवून घेणार नाही अश्या प्रकारची भूमिका घेतली आहे . 

त्यातूनच प्रभाग समिती सभापती पदासाठी निवडणूक लागली असून जिल्हाध्यक्ष सह मेहता विरोधकांनी देखील कंबर कसली आहे . आज उमेदवारी अर्ज भरण्यात आले असता भाईंदर पश्चिमच्या प्रभाग समिती १ साठी भाजपा कडून वैशाली रकवी तर शिवसेनेच्या हेलन गोविंद यांनी अर्ज भरला आहे .  पश्चिमेच्या प्रभाग समिती २ वर भाजपच्या रक्षा भूपताणी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध भाईंदर पूर्व प्रभाग समिती क्र . ३ मध्ये भाजपच्या वतीने मीना कांगणे तर सेनेच्या अर्चना कदम यांच्यात लढत होईल . 

भाईंदर पूर्व ते कनकीया पर्यंतच्या प्रभाग समिती ४ साठी भाजपाचे दौलत गजरे आणि काँग्रेसच्या गीता परदेशी यांनी अर्ज भरला आहे . मीरारोडच्या प्रभाग समिती ५ साठी भाजपाने हेतल परमार यांना तर काँग्रेसने अशरफ शेख यांना उमेदवारी दिली आहे . काशिमीरा प्रभाग समिती ६ मध्ये भाजपच्या सचिन म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आला आहे . त्यामुळे येथील सभापती पद देखील बिनविरोध भाजपा कडे गेले आहे . मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षते खाली मंगळवार २७  रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हि निवडणूक होणार आहे . 

Web Title: Unopposed selection of BJP candidates for the post of 2 ward committee chairpersons of Mira Bhayander Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.