ठाण्यातील माजीवडा उड्डाणपूलावरुन कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यु: एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:26 PM2020-09-30T22:26:39+5:302020-09-30T22:32:19+5:30

नाशिक मुंबई मार्गावरील ठाण्यातील माजीवडा उड्डाणपूलावरुन सुमारे २५ फूट खाली रस्त्यावर कोसळून दुचाकीवर मागे बसलेल्या अबुझर शेख (२८) याचा जागीच मृत्यु झाला. तर फहाद रहेमतुल्ला शेख (३०, रा. मुंब्रा, ठाणे) हा दुचाकी चालक या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

Two-wheeler traveler dies after falling from Majivada flyover in Thane | ठाण्यातील माजीवडा उड्डाणपूलावरुन कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यु: एक गंभीर

उड्डाणपूलाच्या कठडयाला दुचाकीची धडक

Next
ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा उड्डाणपूलाच्या कठडयाला दुचाकीची धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: येथील माजीवडा नाशिक मुंबई मार्गावरील उड्डाणपूलावरुन २५ ते ३० फूट खाली रस्त्यावर कोसळून दुचाकीवर मागे बसलेल्या अबुझर शफीक शेख (२८, रा. मुंब्रा, ठाणे) याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. तर फहाद रहेमतुल्ला शेख (३०, रा. मुंब्रा, ठाणे) हा दुचाकी चालक या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.
मुंब्रा येथील अमृतनगर भागातील रहिवाशी असलेले फहाद आणि अबुझर हे दोघेही मुंब्रा येथे मोबाइल दुरुस्तीचे काम करतात. ते काही कामानिमित्त मोटारसायकलीवरुन ठाण्यातील कासारवडवली भागात आले होते. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडने मुंब्य्राकडे जात होते. तेंव्हा फहाद मोटारसायकल चालवित होता. तर त्याचा मित्र अबुझर हा मोटारसायकलवर त्याच्या मागे बसलेला होता. ते माजीवडा उड्डाणपूलावर भरघाव वेगात डावीकडे वळण घेतांना दुभाजकाला त्यांची मोटारसायकल जोरदार धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात दोघांचेही मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चालक फहाद आणि मागे बसलेला अबुझर हे दोघेही थेट उड्डाणपूलाखाली असलेल्या गोल्डन डाईज नाका येथील माजीवडा चौकात खाली कोसळले. या घटनेत अबुझरच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर फहाद हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्याही डोक्याला तसेच चेहऱ्यावर, हाताला आणि पायाला मार लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. या अपघातास कारणीभूत असलेल्या फहाद याच्याविरुद्ध हयगयीने मोटारसायकल चालवून अबुझर शेख याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी
कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

* यापूर्वीही असाच प्रकारचा अपघात
दोन महिन्यांपूर्वीही याच मार्गावर एक कंटेनर खाली कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मार्गावर होणाºया अशा अपघातांना एमएसआरडीसी, ठाणे महापालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Web Title: Two-wheeler traveler dies after falling from Majivada flyover in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.