ट्रकच्या धडकेत टेम्पोचालकासह दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:17+5:302021-04-23T04:43:17+5:30

ठाणे : ठाण्यात ट्रकच्या धडकेमध्ये टेम्पोमधील चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दोघांनाही ...

Two injured in truck collision | ट्रकच्या धडकेत टेम्पोचालकासह दोघे जखमी

ट्रकच्या धडकेत टेम्पोचालकासह दोघे जखमी

Next

ठाणे : ठाण्यात ट्रकच्या धडकेमध्ये टेम्पोमधील चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दोघांनाही ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मीरा रोड ते वाशीच्या दिशेने घोडबंदर रोडवरील गायमुख येथून हा टेम्पो गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जात होता. त्याचवेळी घोडबंदर ते मीरा रोडच्या दिशेने समोरून आलेल्या एका ट्रकची या टेम्पोला जोरदार धडक बसली. शोएब (३८) आणि एहतास मुलहक (३२) हे दोघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाने धाव घेऊन मदतकार्य केले. वाहतूक शाखेने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two injured in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.