Two arrested in Thane for molesting three college girl | ठाण्यातील तीन तरुणींचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक
वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देअश्लील शेरेबाजीही केलीवागळे इस्टेट पोलिसांची कारवाईगेल्या आठवडाभरापासून सुरु होता शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लोकमान्यनगर येथील दोन तरुणींचा पाठलाग करीत विनयभंग करणा-या अमिर खान (२१) आणि मोसिन शेख (२१, रा. दोघेही रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मुलूंड येथील १९ वर्षीय तरुणी ठाण्यातील तिच्या दोन मैत्रिणींसमवेत ९ जुलै २०१९ रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घरी जाण्यासाठी एमआयडीसी बस थांब्याजवळ उभी होती. त्यावेळी अमिर आणि त्याचे दोन साथीदार हे काळया रंगाची फिल्म लावलेल्या एका कारमधून तिथे आले. ‘गाडीत बस तुला घरी सोडतो, असे बोलून त्यांनी अश्लील शेरेबाजीही केली. त्यानंतर त्यांनी दोन ते तीन वेळा त्यांचा पाठलागही केला. याप्रकरणी त्यांनी संबंधित महाविद्यालयात तक्रार केल्यानंतर या महाविद्यालयाने वागळे इस्टेट पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली. याप्रकरणी १०जुलै रोजी विनयभंगाची तक्रार दाखल झाली. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने गेली सात ते आठ दिवस सापळा लावून त्या कारच्या क्रमांकाच्या आधारे खान आणि शेख या दोघांना १८ जुलै रोजी अटक केली. त्यांच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.
 


Web Title: Two arrested in Thane for molesting three college girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.