ठाण्यात धावत्या कारवर झाड कोसळले : डॉक्टरची सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:29+5:302021-05-18T04:42:29+5:30

ठाणे: तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे ठाण्यात धावत्या मोटारकारवर झाड कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर तातडीने धाव ...

Tree falls on speeding car in Thane: Doctor safely released | ठाण्यात धावत्या कारवर झाड कोसळले : डॉक्टरची सुखरूप सुटका

ठाण्यात धावत्या कारवर झाड कोसळले : डॉक्टरची सुखरूप सुटका

Next

ठाणे: तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे ठाण्यात धावत्या मोटारकारवर झाड कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर तातडीने धाव घेत ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकांनी या कारमधील डॉ. रितेश गायकवाड (४५, रा. ठाणे) यांची सुखरूप सुटका केली.

नौपाडा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाजवळील रस्त्यावरून गोडबोले रुग्णालयाकडे जात असलेल्या धावत्या मोटारकारवर हे झाड अचानक कोसळले. ही घटना इतकी अचानक घडली की मोटारीतील डॉ. रितेश यांना बाहेरही पडता आले नाही. यात ते चांगलेच अडकले. ही माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील कक्षाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य केले. या मोटारकारमध्ये अडकलेल्या डॉ. रितेश यांची अर्ध्या तासाच्या अंतराने सुखरूप सुटका करण्यात आली. या अपघातामध्ये जखमी झाल्यामुळे त्यांना जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर या मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. मात्र, नौपाडा पोलिसांनी ही कोंडी दूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Tree falls on speeding car in Thane: Doctor safely released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.