आगरी महोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण :विनीता राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:23 AM2019-12-12T01:23:33+5:302019-12-12T01:23:56+5:30

महोत्सवाचे केले उद्घाटन; स्मरणिकेचे प्रकाशन

Transforming Culture from Aagri Festival: Vinita Rane | आगरी महोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण :विनीता राणे

आगरी महोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण :विनीता राणे

googlenewsNext

डोंबिवली : आगरी महोत्सव हा खरेदी, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि खाद्यसंस्कृतीचा त्रिवेणी संगम आहे, असे मत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनीता राणे यांनी व्यक्त केले.

आगरी युथ फोरमतर्फे १७व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होत्या. या महोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सावळराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात हा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केडीएमसी महापौर विनीता राणे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कनसा या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. राणे यांनी हा महोत्सव परंपरा जपण्याचे काम करत आहे, असेही यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, मसापा डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, रामकृष्ण पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, चित्रकार प्रभू कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, आगरी महोत्सवाच्या या व्यासपीठावरून अनेक समस्यांना वाचा फोडण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. शहराचा विकास होण्यास या व्यासपीठामुळे मदत झाली.

जगन्नाथ पाटील यांनी वाढणाऱ्या वस्तीला गवसणी घालणे सोपे नाही, असे सांगताच नवीन पिढीला संस्कार देणे गरजेचे आहे, असे सांगितले. आज अतिप्रसंग यांसारख्या घटना घडत आहे. आगरी समाजातील व्यक्ती त्यात नाही. पण तरीही तिसºया पिढीचे प्रबोधन केल्यास त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. या पिढीकडे दुर्लक्ष केले तर ही पिढी वाहवत जाईल.

वाहतूककोंडीवर भाष्य करताना त्यांनी रस्ते वाढत नाही हा सरकारचा दोष असल्याची टीका केली. समाजाची व्याप्ती मोठी असली तरी परंपरेचा पगडा कमी करणे गरजेचे आहे. आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाद्वारे समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. समाजप्रबोधन करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. आगरी समाज लग्न खर्च कमी व्हावा यासाठी बैठका घेत आहे. आगरी समाजातील काही प्रथा आटोक्यात आणण्याची गरज आहे. कणसा या स्मरणिकेतील कथा, कविता वाचण्यास त्यांनी सांगितले. यातील चांगल्या गोष्टीचे चिंतन करण्याचा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

गुलाब वझे यांनी आगरी महोत्सव हा सर्वांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येत असतो. सांस्कृतिक कार्यक्रमातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. खाद्यपदार्थासोबत चांगल्या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने ठेवून बौद्धिक खाद्यही या महोत्सवातून दिले जाते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आकर्षक देखावे,सेल्फी पॉइंटवर गर्दी

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विविध सणांचे दर्शन घडविणाºया देखावे या महोत्सवात उभारले आहेत. हे देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये विविध सणांची छायाचित्रे अधिक आकर्षण ठरत आहेत. काळ बदलला तसे जीवन गतिमान झाले आणि प्रगतीनुरूप वाहनांचे विविध प्रकार आपल्यासमोर आले. सुरुवातीच्या काळात वापरली जाणारी बैलगाडी आणि सायकल काळाच्या ओघात मागे पडली असली तरी या वाहनांचे स्मरण कायम राहावे यासाठी बैलगाडी, सायकल या वाहनांचा सेल्फी पाइंट ठेवण्यात आला आहे. या सेल्फी पाइंटला सेल्फी काढण्यासाठी तरुणाई गर्दी करत आहे.

 

Web Title: Transforming Culture from Aagri Festival: Vinita Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.