ठामपा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:53 AM2020-02-16T01:53:29+5:302020-02-16T01:53:42+5:30

आयुक्तांचा निर्णय । सहायक आयुक्त, उपायुक्तांचा समावेश

Transfers under Impact Officers | ठामपा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

ठामपा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांच्या शनिवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अंतर्गत बदल्या केल्या. यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वांच्या टीकेचे धनी झालेले उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून शिक्षण विभागाचा कार्यभार काढून त्यांची सचिवपदी बदली केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जोशी यांच्यावर चांगलीच टीका होत होती. शिक्षण विभागाची परवानगी न घेता प्रस्ताव महासभेत आणणे, नको त्या प्रस्तावांवर वाढीव खर्च अशा काही प्रस्तावांवरून त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. अखेर, त्यांच्याकडून शिक्षण विभागाचा कार्यभार काढण्यात आला आहे. आता त्यांच्याकडे घनकचरा विभाग, घनकचरा प्रकल्प, जिद्द शाळा, महापालिका सचिव (अतिरिक्त कार्यभार) सोपविला आहे. तर, महापालिका सचिव असलेले अशोक बुरपुल्ले यांच्याकडे अतिरिक्त असलेला सचिवपदाचा कार्यभार काढला असून परिवहनचे व्यवस्थापकपद त्यांना देण्यात आले आहे. तसेच अतिक्रमण नियंत्रण व निष्काषित करणे, स्थावर मालमत्ता आणि सुरक्षा यांची जबाबदारी त्यांच्यावर कायम ठेवली आहे. परिमंडळ-३ वरून त्यांना परिमंडळ-१ वर आणण्यात आले आहे. तर, परिवहन व्यवस्थापकपदी असलेले संदीप माळवी यांच्याकडे पुन्हा माहिती व जनसंपर्क परवाना, क्रीडा व सांस्कृतिक, आपत्तीव्यवस्थापन, जाहिरात, चिंतामणराव देशमुख प्र.प्र. संस्था आणि अभिलेख कक्ष यांच्या जबाबदाºया कायम ठेवल्या आहेत. वर्षा दीक्षित यांच्या खांद्यावर आता परिमंडळ-३ ची जबाबदारी सोपविली आहे.

मारुती गायकवाड हे मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त
च्नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांची मुंब्रा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी तर शंकर पाटोळे यांची उथळसरवरून नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी बदली केली आहे.
च् तर, प्रणाली घोंगे यांची सामान्य प्रशासन विभागातून उथळसर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी, महेश आहेर यांच्या खांद्यावर असलेली मुंब्रा प्रभाग समिती काढून त्यांना आता वागळे प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी आणले आहे. तसेच त्यांच्याकडील स्थावर मालमत्ता व्यवस्थापकपदाचा कार्यभार काढला असून वागळे प्रभाग समितीचे सहायक आयुक्त विजय जाधव यांच्याकडे स्थावर मालमत्ता हे खाते सोपविले आहे.

Web Title: Transfers under Impact Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.